अभाविप वरोरा शाखे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा…

78

 

रोहन आदेवार
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ

वरोरा: आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा – वरोरा तर्फे स्थानिक शहीद योगेश डाहुले स्मारक वरोरा येथे अभाविप पूर्व कार्यकर्ता दिलीपजी घोरपडे, जिल्हा समिती सदस्य शकिल शेख, गणेश नक्षिणे व नगर मंत्री तृप्ती गिरसावळे यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. व शहीद योगेश डाहुले यांच्या स्मारकाला माल्यार्पण करण्यात आले. व भारत स्वतंत्र करण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या सर्वं स्वतंत्र सैनिकांना 5 मिनिटांचे मौन पाडून श्रद्धांजली देऊन मानवंदना देण्यात आली व मिठाईचे वाटप करून सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. ‘भारत माता की जय’ ‘वंदे मातरम’ ‘प्रजासत्ताक दिन चिरायू हो’ अशा प्रकारच्या घोषणा देऊन प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

यावेळी महाविद्यालय प्रमुख लोकेश रुयारकर, आंदोलन प्रमुख अंकित मोगरे, विद्यार्थ्यींनी प्रमुख पूजा येरगुडे, क्रिडा प्रमुख स्वाती हनुमंनते,छकुली पोटे, निधी राखुंडे, छकुली गेडाम, अथर्व गवळी, यश भट्ट, अनिकेत गारघाटे आदी अभाविप कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.