मुलांशिवाय प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम अपूरा वाटतोय – नगरसेवक नील सोमैया

450

 

दिलीप अहिनवे
मुंबई महानगर प्रतिनिधी
‘दखल न्युज भारत’

मुलुंड, दि. २६ : मुलुंड ‘टी’ विभागातील मुलुंड कॅम्प शाळा संकुलात स्थानिक नगरसेवक नील सोमैया व मुलुंड कॅम्प मराठी शाळेचे शिपाई दत्ताराम कळंबटे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कोरोना विषाणुची पार्श्वभूमी विचारात घेऊन सामाजिक अंतर ठेवून तसेच सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.

मुलुंड कॅम्प शाळा संकुलात ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुलुंड येथील प्रभाग क्र. १०८ चे स्थानिक नगरसेवक नील सोमैया हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी मुलुंड कॅम्प इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच इमारत प्रमुख रिओ साबळे, मुलुंड कॅम्प मराठी शाळेचे मुख्याध्यापक मनोज पवार, गुजराती शाळेच्या वरिष्ठ शिक्षिका मिनाक्षी राजगोर, माध्यमिक इंग्रजी शाळेचे वरिष्ठ शिक्षक विश्वनाथ गुहे, इमारतीतील सर्व प्रशिक्षक, सर्व स्पेशल शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व इमारतीची देखभाल करणारे कर्मचारी उपस्थित होते.

नगरसेवक नील सोमैया यांनी सद्य स्थितीत मुलांशिवाय ध्वजारोहण कार्यक्रम अपुरा वाटतोय. कार्यक्रमाला शोभा आली नाही अशी खंत व्यक्त केली. कार्यक्रमाला मुलांची उपस्थिती, मुलांचा गोंगाट तसेच संपुर्ण परिसर दुमदुमून टाकणारी प्रभात फेरी नसल्यामुळे फार वाईट वाटतेय. लवकरात लवकर मुले शाळेत येतील. शाळा नियमित सुरु होतील. जगावर ओढवलेले कोरोनाचे संकट नष्ट होईल, सर्व दैनंदिन जीवन पुर्वपदावर येईल अशी आशा व्यक्त केली.

मुख्याध्यापक मनोज पवार यांनी ध्वजारोहण कार्यक्रमापुर्वी भारताच्या संविधानामधील उद्देशिका (सरनामा) याचे सामुहिक वाचन उपस्थितांकडुन करुन घेतले. संगीत शिक्षिका मंजुषा माने यांनी आपल्या सुमधुर आवाजात देशभक्तीपर गीते सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण शिक्षक दिलीप अहिनवे व यशवंत चव्हाण यांनी केले.