113 व्या केंद्रीय राखीव पोलिस दलाने ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने उपचार घेणारे बालकांना व रुग्णांना ब्लॅंकेट व मिठाई चे वाटप केले.

112

धानोरा /भाविकदास करमनकर

आज सीआरपीएफ 113 बटालियन च्या जवानांनी धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात जाऊन रूग्णांना मिठाई वाटप केली, तसेच समाज सेवा संस्थान, लायन्स क्लब, नागपूर यांच्या सहकार्याने प्राप्त ब्लॅंकेट वाटप केले, ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे उपचार घेणाऱ्या बालकांना थंडीपासून बचाव करण्यासाठी ब्लॅंकेट व मिठाई चे वाटप करण्यात आले,
यावेळी सीआरपीएफ 113 बटालियन चे द्वितीय कमांड अधिकारी श्री. राजपाल सिंह यांनी डॉक्टरांना आणि शासकीय रुग्णालयात कार्यरत सर्व कर्मचार्‍यांना मिठाई पुरविली, यावेळी उप कमांडंट प्रमोद सिरसाट, सहाय्यक कमांडंट रोहताश कुमार, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.देवेंद्र सावसाकडे, गणेश कुळमेथे, स्टाफ नर्स नलिनी येल्ले, स्नेहा भजगवळी, मशाखेत्री व रुग्णालयाचे व सीआरपीएफ चे अधिकारी व सैनिक उपस्थित होते.
सीआरपीएफ च्या 113 बटालियन च्या अधिकारी व जवानांनी केलेल्या या कामाचे रुग्णालयातील कर्मचारी व धानोरा वासियांकळून खूप कौतुक केले आहे