जनजाती सल्लागार परिषदेची सदस्यपदी माजी राज्यमंत्री तथा अहेरी चे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण

133

 

संपादक जगदीश वेन्नम,रमेश बामनकर

गडचिरोली:- माजी राज्यमंत्री तथा विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे महाराष्ट्र जनजाती (अनु.जमात) सल्लागार परिषदेमध्ये नुकतेच सदस्यपदी निवड झाली असून निवडीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये व अहेरी निर्वाचन क्षेत्रातील आदिवासी बांधवांमध्ये आनंद संचारला आहे.
यात मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे पदसिद्ध अध्यक्ष असून आदिवासी विकास मंत्री ना.ऍड.के.सी. पाडवी पदसिद्ध उपाध्यक्ष आहेत. विशेष म्हणजे संसद सदस्य व प्रशासकीय अधिकारी यांनाही कायम निमंत्रित सदस्य म्हणून नामनिर्देशन करण्यात येते त्यांचाही यात समावेश आहे.
भारतीय संविधानाच्या 5 व्या अनुसूचीतील भाग ख मधील परिच्छेद-4(1) अनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये जनजाती सल्लागार परिषद अस्तित्वात आहे.उपरोक्त दिनांक 4-02-2016, 12-02-2016 व 11-07-2016 रोजीच्या शासन निर्णयानुसार जनजाती सल्लागार परिषदेची पुनर्रचना करण्यात आली. तथापि नवीन मंत्रिमंडळ स्थापन झाल्यामुळे महाराष्ट्र जनजाती सल्लागार परिषदेची पुनर्रचना करणे आवश्यक होते.
शासन निर्णयानुसार भारतीय संविधानाच्या 5 व्या अनुसूचीतील भाग ख मधील परिच्छेद भाग 4चा उपपरिच्छेद-3 अनवे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र जनजाती सल्लागार परिषद नियम 1960 प्रमाणे या शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेची पुनर्रचना करण्यात आली आहे.
यात आमदार धर्मराव बाबा आत्राम यांची सदस्यपदी निवड झाल्याने राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन केले जात आहे.