प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्मृती प्रतिष्ठान तर्फे इको- प्रो बहुउद्देशीय संस्थेला पूर्व.खा.नरेशबाबु पुगलिया ने सम्मानित केले

215

शंकर महाकाली
दख़ल न्यूज़ भारत
बल्लारपुर/चंद्रपुर चंद्रपूर तालुका प्रतिनिधि
📲 ८८५५०४३४२०

चंद्रपूर:-( दिनांक २६ जानेवारी २०२१) प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्मृति प्रतिष्ठान चंद्रपूर च्या वतीने देश विकासासाठी व समाज उत्थानासाठी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्यकरणाऱ्या संस्थेला किंवा व्यक्तीला प्रियदर्शनी इंदिरा गांधी विशेष सेवा पुरस्कार दिला जातो.
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी प्रियदर्शनी चौकातील राष्ट्रमाता इंदिराजी गांधी पुतळ्याच्या परिसरात अतिशय थाटात व उत्साहात इंदिरा गांधी विशेष सेवा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी खासदार नरेशबाबूजी पुगलिया यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख अतिथी डॉक्टर विजय आईंचवार, डॉक्टर अशोक वासलवार, डॉक्टर महावीर सोईतकर, यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या समारंभात इको प्रो बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सत्कारमूर्ती बंडूजी धोतरे यांच्या कार्याचा गौरव केला. आपल्या अध्यक्षीय भाषणात नरेशबाबू म्हणाले की बंडू धोतरे हे अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेला युवक आहे, देशप्रेमाने व सामाजिक बांधिलकी ने प्रेरित होऊन, देश विकासाचे कामे व सामाजिक समाज उत्थानाचे कामे आपल्या सहकारी कार्यकर्त्यांसह करीत आहे. ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. या संस्थेचे कार्य पर्यावरण संवर्धन, वनसंवर्धन, वन्यजीव संवर्धन, पुरातत्त्व वास्तूचे जतन व सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान, शिक्षण इत्यादी कार्य इको-प्रो बहुद्देशीय संस्था मोलाचे योगदान देत आहे. शेकडो वर्षापूर्वी बांधलेल्या चंद्रपूरच्या ऐतिहासिक नगरी सभोवतालच्या किल्ला, रामाळा तलाव, जुनोना तलाव, झरपट नदी, यांचे स्वच्छता व जतन करण्याचे काम बंडूजी धोतरे यांच्या नेतृत्वात इको- प्रो संस्था बहुद्देशीय संस्था करीत आहे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी खासदार नरेशबाबू पुगलिया तसेच मान्यवर प्रमुख अतिथींच्या हस्ते इंदिरा गांधी विशेष सेवा पुरस्कार चे मानकरी इको प्रो बहुउद्देशीय संस्थेला (१ लाख ११ हजार १११ रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ) देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी काँग्रेसचे युवा नेते राहुलबाबू पुगलिया, विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष (ग्रामीण) गजाननराव गावंडे , विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे चंद्रपूर शहराध्यक्ष तथा मनपा नगरसेवक देवेंद्र बेले, मनपा नगरसेवक अशोक नागापुरे, NSUI चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष स्वप्नील तिवारी, कामगार नेते रामदास वागदरकर, अनिल तुंगडीवार, गजानन दिवसे, काँग्रेसचे अरुण बुरडकर, सुधाकरसिंह गौर, युवक काँग्रेसचे दुर्गेश चोबे तसेच तसेच प्रतिष्ठानचे पदाधिकारी व व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.