महात्मा ज्योतिबा फुले हा.तथा महाविद्यालयात ध्वजारोहण संपन्न

140

प्रतिनिधी प्रविण तिवाडे
आज दिनांक २६/०१/२०२१ रोजी महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल,कनिष्ठ तथा वरिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य,प्रहलाद मंडल, प्राचार्य,संजय फुलझेले यांनी ध्वजारोहण केले या कार्यक्रमास शिक्षक-पालक संघाचे अध्यक्ष ताराचंद घ्यार हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.यावेळी संविधान वाचन करण्यात आले.शारिरीक शिक्षक सुशीलकुमार अवसरमोल यांनी उपस्थित सर्व प्राचार्य,प्राध्यापक,शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तंबाखू मुक्ती दिनाच्या निमित्ताने सामुहिक शपथ दिली. प्राचार्य,प्रहलाद मंडल यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या व तंबाखू मुक्ती दिनावर प्रकाश टाकून त्याचे दुष्परिणाम सांगितले.यावेळी शाळेचे पर्यवेक्षक श्रीधर चौधरी,वरीष्ठ महाविद्यालयचे प्राध्यापक,कनिष्ठ महाविद्यालयचे प्राध्यापक व हायस्कूलचे सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.