ग्रामपंचायत कोर्ला माल येथे कोविड योध्दांचा सत्कार , ग्रामपंचायत कर्मचारि हस्ते ध्वजारोहण करून दिला सन्मान

246

दिपक बेडके प्रतिनिधी सिरोंचा

सिरोंचा: जगामध्ये कोरोना – 19 विषाणूची महामारी चालु असताना स्वतः च्या जिवाची परवा न करता ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामस्थांना आरोग्य सेवा पुरविणे , ग्रामस्थांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करणे,तालुका प्रशासनाला माहिती पोहचविणे हि सर्व कामे स्थानिक कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडले बाबत कर्मचाऱ्यांचा जाहिर सत्कार करण्यात आला. अंगणवाडी सेविका नंदा पुजारी,कमला आलम,आरोग्य सेविका एस व्ही चौधरी,मोहिनी पिपरे, आशा वर्कर लक्ष्मी कोडापे,सपना आलम, ग्रामपंचायत कर्मचारी व्यंकटेश सडमेक यांना गौरवपत्र तसेच भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले.
कोरोना संक्रमनात ग्रामपंचायत साठी हवी ती माहिती जमा करणे,ग्रामस्थांशी सुसंवाद साधणे, पाणीपुरवठा देखभाल ,स्वच्छता विषयक जनजागृती इमानेइतबारे करणारे ग्रामपंचायत कर्मचारी यांचे हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करून त्यांना सन्मानित करण्यात आले.
संविधानाची उद्देशपत्रिकेचे वाचन करण्यात येऊन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.कार्यक्रमाचे संचालन ग्रामसेवक मंगेशकुमार वाळके यांनी तर आभार प्रदर्शन रोजगार सेवक सुरेश कोडापे यांनी मानले.कार्यक्रमास पोलीस पाटील चेलमय्या सडमेक,माजी सरपंच सुशीला वेलादी,पोस्टमॅन जनगम, पशुवैद्यकीय कर्मचारी मडावी,कोतवाल विजय आलम,मोबिलाइजर शिवराम सडमेक,प्रतिष्ठित नागरिक गणपत वेलादी, श्रीनिवास चेडे ,रामलू नूतीकटला आदी उपस्थित होते .