गुडाळचे सामाजिक कार्यकते रामदास पोवार यांची ऑल इंडिया सिने वर्कर ऑसोशियनच्या महाराष्ट्र राज्य जॉईंट सेक्रेटरी पदी निवड . चित्रपटसृष्टीतील कर्मचाऱ्यांसाठी कार्यरत राहणार -रामदास पोवार

 

प्रतिनिधी / उदय कांबळे

कोल्हापूर : गुडाळ ता . राधानगरी येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास पोवार यांची ऑल इंडिया सिनेवर्कर ऑसोशियनच्या महाराष्ट्र राज्य जॉईट सेक्रेटरी पदी निवड करण्यात आली आहे . या निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष संजय पाटील यांनी दिले . सदर निवडीसाठी पोवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश गुप्ता यांचे बहुमोल सहकार्य लाभले .
ऑल इंडिया सिनेवर्कर ऑसोशियन ची स्थापना सुप्रसिद्ध अभिनेते संजय दत्त यांनी केली असून चित्रपटसृष्टीत विविध प्रकारची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कार्यरत आहे . यावेळी निवडीनंतर रामदास पोवार म्हणाले की , चित्रपटसृष्टीत काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देने , योग्य मानधन मिळवून देणे , त्यांना योग्य वागणूक दिली जाते की नाही याची चौकशी करणे , त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांवरील होणाऱ्या अन्याय -अत्याचाराविरुद्ध विविध प्रकारच्या आंदोलनाद्वारे लढा उभारणार असल्याचे सांगत त्यांच्यासाठी सदैव कार्यरत राहणार असे पोवार यांनी सांगीतले .
पोवार हे राधानगरी पंचायत समितीच्या माजी सभापती शकूंतला पोवार यांचे दुसरे चिरंजीव असून त्यांच्या उत्कृष्ट सामाजिक कार्याची दखल घेवून सदर पदी त्यांची निवड झाल्याचे समजते आहे .