सम्यक जागृत बौध्द महीला समीती दिक्षाभूमी यांचे वतीने देसाईगंज येथे प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने राष्ट्रीय ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न….

119

 

प्रितम देवाजी जनबंधु
कार्यकारी संपादक

सम्यक जागृत बौद्ध महीला समीती दिक्षाभूमी देसाईगंज येथे 26 जानेवारी 2021 रोजी राष्ट्रीय ध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आले होते. सम्यक जागृत बौध्द महीला समीतीच्या सदस्यगण तथा उपाध्यक्षा शँमला राऊत यांच्या अध्यक्षतेखाली समीतीच्या सचीव ममताताई जांभूळकर, फूलजेबा डांगे, सामाजीक कार्यकर्ते पवन गेडाम, जांभूळकर सर, प्रकल्प अधीकारी मणीष गणवीर सर यांनी प्रथम तथागत सम्यक सम्बुद्ध व महामानव प्रज्ञासूर्य डाँ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतीमांना माल्यार्पन करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बाबासाहेबांना नतमस्तक होऊन ममताताई जांभूळकर यांच्या हस्ते ध्वजारोहन कार्यक्रम पार पाडण्यात आला.

उपस्थित सर्व सम्यक जागृत बौध्द महीला समीती देसाईगंज च्या सर्व सदस्यगण तथा उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रगीताने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत समतादूत वंदना धोंगडे यांनी सर्वांच्या समवेत भारतीय संवीधानाचे वाचन करूण संवीधानाचे महत्व व गणराज्य दिनाचे महत्व पटवून सांगीतले. अशाप्रकारे कार्यक्रम संपन्न करण्यात आला.