इंदापूरात आरोग्य कर्मचारी पोलीस कर्मचारी अंगणवाडी सेविका यांचा कोवींड योध्दा पुरस्काराने सन्मान!

250

 

निरा नरशिंहपुर  प्रतिनिधी :-बाळासाहेब सुतार, 

कोरोना गंभीर काळात आशावर्कर यांनी केलेले काम खरोखरच खूप कौतुकास्पद असून दै.जनप्रवास, बारामती झटका वेब पोर्टल ता.प्रतिनिधी शिवाजी आप्पा पवार व दै.तुफान क्रांती ता प्रतिनिधी गणेश कांबळे यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासून जो कार्यक्रम आयोजित केला असा कार्यक्रम कोवींड योध्दासाठी आज पर्यत कुणीच घेतला नाही.त्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजक पत्रकार शिवाजी आप्पा पवार व पत्रकार गणेश कांबळे यांचे खरोखरच जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे

या कार्यक्रमाला मला बोलावून माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून केक कापून वाढदिवस साजरा केला

त्याबदल मला मनापासून आनंद झाला असे जि.प.सदस्य अंकिता पाटील म्हणाल्या.कोरोना संकटकाळात आपल्या जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या कोविड योद्धांचा दै. जनप्रवास, दै. तुफान क्रांती व बारामती झटका वेब पोर्टल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला कोविड योद्धा सन्मान सोहळा गुरुवार (दि.२१) रोजी इंदापूर येथील कै.शंकररावजी पाटील सभागृहात पार पडला.

कोरोनाच्या संकटकाळात एकीकडे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेले असताना नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता अशा गंभीर परिस्थितीत आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन अहोरात्र कष्ट घेऊन स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काम करत होते.प्रसंगी काहींनी आपला जीव देखील गमावला त्यांच्या ह्या बलिदानाचे, कष्टाचे कुठेतरी चिज व्हावे व त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून दै. जनप्रवासने दै. तुफान क्रांती व बारामती झटका वेब पोर्टलच्या संयुक्त विद्यमाने या कोविड योद्धांचा सन्मान सोहळा इंदापूर येथे आयोजित करण्यात आला होता

या कार्यक्रमाच्या सुरूवातीला कोरोना महामारीमध्ये शहीद झालेल्या कोरोना योध्दांना श्रध्दांजली अर्पण करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रस्ताविक पत्रकार गणेश कांबळे यांनी केले.राज्याचे माजी सहकार संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील साहेब,इंंदापुर नगराध्यक्षा अंकिता शहा,सभापती स्वातीताई शेंडे जि.प.सदस्य अंकिता पाटील,डॉ लक्ष्मण आसबे,सरपंच किरण पाटील,दै तुफान क्रांती संपादक मिर्जा गालिफ मुजावर, बारामती झटका चँनलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील दौंड वैद्यकीय अधिकारी डॉ सुरेखा पोळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

समाजभूषण डॉ लक्ष्मण आसबे,आशावर्कर प्रतिनिधी, दौंड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सुरेखा पोळ, डॉ पाणबुडे सर,नगराध्यक्षा अंकिता शहा,जि.प सदस्य अंकिता पाटील

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, दै.तुफान क्रांती संपादक मिर्जा गालिफ मुजावर इत्यादीनी कोरोना संदर्भात मनोगते व्यक्त केली.त्यानंतर अंकिता ताई पाटील व अंकिता ताई शहा यांचा केक कापुन वाढदिवस साजरा करण्यात आला.दै जनप्रवास,बारामती झटका वेब पोर्टल ता.प्रतिनिधी शिवाजी आप्पा पवार व दै.तुफान क्रांती ता.प्रतिनिधी गणेश कांबळे यांच्या हस्ते माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार करण्यात आला

कोरोना काळात खुप आडचणी आल्या तालुक्यातील अनेक जणांची लाँकडाऊन मध्ये मोठ्या प्रमाणात गैरसोय देखील झाली.कोरोना गंभीर परिस्थितीत घर संसार संभाळत आशावर्कर ,आरोग्य सेविका यांनी उत्तमरीत्या कोरोना काळात काम केले.आजचा हा कार्यक्रम हा खरोखरच सुवर्ण अक्षरांनी लिहीण्यासारखा आहे कारण कोरोना सारख्या महाभयंकर गंभीर परिस्थीतीत अनेक डॉक्टर,नर्स यांनी जिव धोक्यात घालून कोरोना पाँझिटीव्ह रूग्णांची प्रामाणिकपणे सेवा केली अशा कोवींड काळात उत्तम काम करणाऱ्या आरोग्य कर्मचारी पोलीस कर्मचारी यांचा कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानित करण्याचे काम दै.तुफान क्रांती ता प्रतिनिधी गणेश कांबळे व दै.जनप्रवास,बारामती झटका वेब पोर्टल ता.प्रतिनिधी शिवाजी आप्पा पवार यांनी केले त्याबदल दोन्ही पत्रकार बांधवाचे मी मनापासून कौतुक करतो असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.

या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते कोरोना काळात उत्कृष्ट पणे काम केलेल्या आरोग्य कर्मचारी,पोलीस कर्मचारी,विविध कर्मचारी वर्गाचा सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून सदर कोविड योद्धांचा नामोल्लेख करत त्यांच्या कार्याचा गौरव केला व त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.जनप्रवासचे पत्रकार शिवाजी पवार व दै.तुफान क्रांतीचे पत्रकार गणेश कांबळे यांनी स्वयंप्रेरणेने सदर कार्यक्रम आयोजित केला.त्याबद्दल अनेकांनी त्यांचे कौतुक केले व आभार मानले.तसेच दै. जनप्रवास, तुफानक्रांती व बारामती झटका वेब पोर्टल यांनी वेळोवेळी बातम्यांच्या माध्यमातून जनजागृती केली त्याबद्दल त्यांचेही विशेष आभार मानण्यात आले

सदर या कार्यक्रमास उपस्थित राहून रामभाऊ आसबे भाजप युवा मोर्चा आध्यक्ष.महेंद्र दादा रेडके पुणे जिल्हा कुस्तीगीर प.सदस्य, हिराताई पवार दत्तकृपा प्रतिष्ठान महिला अध्यक्ष, शकील सह्यद शहराध्यक्ष भाजप,गावडे सर ता.वैद्यकीय अधिक्षक, श्री निवास कदम पाटील संपादक बारामती झटका ,संपादक दै.तुफान क्रांती मिर्जा गालिफ मुजावर,सरपंच किरण पाटील, इंदापुर उपजिल्हा रूग्णालय अधिक्षक एकनाथ चंदनशिवे,डॉ बाळासाहेब राऊत अस्थिरोग तज्ञ आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आभार दै.जनप्रवास बारामती झटका वेब पोर्टल ता प्रतिनिधी शिवाजी आप्पा पवार यांनी केले या कार्यक्रमासाठी सुरेख असे सुत्रसंचालन पन्हाळकर सर यांनी केले

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160