संविधानिक निर्णय घेण्यात अपयशी टोपे बहिरुपी?? पुढे फक्त टोप्याच देणार??

157

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी
मुंबई. /२६जानेवारी २०२१ .
मानवी मुलभूत अधिकार आणि हक्काचा (कलम १२ ते ३५) अभ्यास न करता महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यात निरंतरपणे NHM मध्ये कंत्राटी पद्धतीने आरोग्य सेवेचे व्यवस्थापन आणि काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आयुष्याचा, परिवाराचे विचार न करता बहिरुप्या सारखे निर्णय आणि ट्युट करून कंत्राटी कर्मचाऱ्यांना टोप्या देऊन जिवनाशी खेळण्याचे काम केले आहे. असे स्पष्ट मत चक्रधर मेश्राम यांनी व्यक्त केले आहे.. टोपे यांनी राजकारणी टोप्या खेळण्याचे काम करण्यापूर्वी भारतीय राज्यघटनेतील मानवी हक्क आणि अधिकाराचा सखोल अभ्यास करून निर्णय घ्यावा..
टोपे साहेब हे आरोग्य मंत्री असुनही मागील १५ वर्षापासून सतत NHM मध्ये कंत्राटी पद्धतीने काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या भावना समजून घेण्यासाठी अपात्र ठरत असतील तर स्वखुशीने या प्रजासत्ताक दिनाच्या शुभ पर्वावर राजीनामा द्यावा.. आतापर्यंत झोपेत असलेल्या अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि सरकारने NHM कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी यश मिळविले असल्याचे दिसून येते नाही.. पण ?? ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचा ” दूत ” समजल्या जाणाऱ्या आरोग्य सेवकांच्या पोटाची भाकरी हिरावून घेण्याचे बहिरुपी षडयंत्र काम टोपे यांनी सुरू केले आहे.

३५ व्या वर्षी NHM मध्ये बरेच कर्मचारी कंत्राटी पद्धतीने कामाला लागले आणि त्यांच्या सेवा १५ वर्ष पूर्ण झाली तर त्यांचे वय आता ५० वर्ष पूर्ण झाले असेल. तर त्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या टोपे साहेब ओपन मध्ये कि आरक्षित जागांवर करून दाखवणार आहात.?? असा गहण आणि न सोडता येणारा प्रश्न उपस्थित होत आहे. आरोग्य यंत्रणेचा डोलारा हा NHM मध्ये कंत्राटी पद्धतीने काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या भरवशावर मागील अनेक वर्षे पासून सुरू असूनही आतापर्यंत राजकीय आणि सत्तेवर असलेल्या शासनाला योग्य निर्णय घेतला नाही.. त्यामुळे शासनकर्त्या मध्ये किती सुसुत्रता, पारदर्शकता, विश्वासार्हता, आणि काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रती असलेली आत्मियता स्पष्ट पणे दिसून येते.
आरोग्य कंत्राटी कर्मचारीवर्ग घरोघरी जाऊन काविळ, अतिसार, हगवण हे जलजन्य आजार, हिवताप, हत्तीरोग, डेंग्यू, चिकनगुनिया, मेंदूज्वर हे किटकज्न्य आजार, मधूमेह, कॅंसर या सारख्या अनेक आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांचा शोध घेऊन रुग्णालयीन सेवा देतात. निर्णय आणि नियमांचा विचार केला तर 12 वर्षे पूर्ण झाले आहे अशा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी आणि पदोन्नती ही दिली जाते. मग निरंतर आरोग्य कंत्राटी पद्धतीने काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या भावना, हक्क आणि अधिकार शासनकर्त्यांना समजत नाही का?अशा कामाच्या ठिकाणी आपल्या परिवारातील सदस्यांना एखाद्या वर्षे तरी काम करायला लावून पहावे. असे परखड मतही चक्रधर मेश्राम यांनी व्यक्त केले आहे.
शासनाचे आरोग्य मंत्री.,आणि आरोग्य संचालनालयाने न्यायालयाने दिलेल्या निर्णयांची अवहेलना करीत भारतीय राज्यघटनेच्या अवमान केला आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्या नंतर १८ जानेवारी २०२१ पासून पदभरतिच्या पहिल्या टप्प्याला सुरूवात झाली असली तरी मागील १५ वर्षापासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचे??? करण्यात येणार आहे हे अद्यापही टोपे साहेब यांनी स्पष्ट का❓सांगितले नाही. राज्यातील सर्वच जिल्ह्यात पदभरति अपेक्षित असून सार्वजनिक आरोग्य विभागात १७ हजार ३३७ आणि वैद्यकीय शिक्षण विभागात ११ हजार तसेच राज्यातील महापालिका रुग्णालयात तिस हजार पदे रिक्त आहेत. त्या सर्व ठिकाणी अनुभव, शैक्षणिक पात्रता लक्षात घेऊन सरसकट समायोजन करण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी. आणि मानवी मुलभूत अधिकार आणि हक्कांना तडा जाणार नाही याची जाणीव ठेवून योग्य निर्णय घेण्यात यावे. टोपे साहेब यांनी वाढीव वेतनाची रक्कम लवकरच मिळणार आहे असे आश्वासन दिले होते. दिवाळी होऊन किती दिवस झाले.?? नविन वर्षे सुरू होऊन प्रजासत्ताक दिन साजरा करण्याची वेळ आली तरीही टोपे साहेब यांना जाग आली नाही? या सारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करणे आवश्यकच ठरेल. असा सल्लाही चक्रधर मेश्राम यांनी दिला आहे.