कोंढाळा जिल्हा परिषद उच्च प्राथमीक शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा

136

सत्यवान। रामटेके(देसाईगंज ग्रामीण तालुका प्रतिनिधी)
कोंढाळा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत ७१ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.सकाळच्या सुमारास ध्वजारोहण शाळेतील मुख्याध्यापक निरुपारा देशपांडे यांनी केले.
सध्याच्या काळात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असल्याने २६ जानेवारीचे सर्वच शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले.यामुळेच अगदी साध्या पध्दतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.केवळ ध्वजारोहण करून संविधानाची शपथ व व्यसनमुक्तीची शपथ घेण्यात आली.
ध्वजारोहण करतेवेळी शाळेच्या मुख्याध्यापिका निरुपारा देशपांडे, संतोष टेंभुरणे,योगेश ढोरे,सुनील निंबार्ते,सुरेश आदे,रेखा चौधरी,माधुरी रामगुंडे,रजनी जांभूळकर,हरिभाऊ पत्रे,जयानंद बुराडे व आदी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.