प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन झाडगाव अंगनवाडी केंद्रात ‘बेटी बचाओ,बेटी पढाओ’कार्यक्रम संपन्न

144

 

मंगरुळपीर-भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन मंगरुळपीर तालुक्यातील झाडगांव येथे अंगनवाडी केंद्रामध्ये ‘बेटी बचाओ,बेटी पढाओ’या विषयावर जनजागृतीपर नाटिका सादर करुन ऊपस्थीतांना मंञमुग्ध केले.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने झाडगाव येथे अंगनवाडी सेविका वैशाली राऊत यांच्या प्रमुख मार्गदर्शनात कार्यक्रम घेन्यात आला.या कार्यक्रमप्रसंगी संविधान निर्माते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाला सुरुवात करन्यात आली.लोकांमध्ये जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातुन या कार्यक्रमप्रसंगी कु.रक्षा शिंदे,जागृती शिंदे,संस्कृती गावंडे,कु.इशानी राऊत या विद्यार्थ्यांनींनी ‘बेटी बचाओ,बेटी पढाओ’या विषयावर जनजागृतीपर नाटीका सादर केली.प्रमुख मान्यवरांमध्ये ऊषा बेलखेडे,सपना गावंडे,अलका शिंदे,वैशाली राऊत आदींची ऊपस्थीती होती.

प्रतीनिधी-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206