माणकी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण

125

 

वणी : परशुराम पोटे

वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मौजे माणकी येथील ग्राम पंचायत कार्यालय तथा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा माणकी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रथम ग्राम पंचायत मध्ये मुख्यध्यापक सुनील लोनगाडगे यांचे हस्ते तर शाळेत शाळा समिती अध्यक्ष अनिल ठेंगणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रजासत्ताक दिन व संविधानाचे महत्व शाळेचे शिक्षक आनंद पाटील यांनी उपस्थितांसमोर मांडले.
सदर ध्वजारोहणासाठी शाळा समिती अध्यक्ष अनिल ठेंगणे, उपाध्यक्ष गजानन काकडे, माजी शाळा समिती अध्यक्ष परशुराम पोटे, पोलिस पाटील सौ.मिनाक्षी मिलमिले, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रमोद क्षिरसागर, नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्य कैलास पिपराडे, नानाजी पारखी, शंकर माहुरे, सौ.वंदना कैलास पिपराडे,सौ.इंदिरा परशुराम पोटे,सौ. सुनिता सुनिल कुत्तरमारे,नलीनी सुरेश मिलमिले,यांच्यासह उमेश सावरकर, महादेवराव चिडे,दादाजी मालेकर, विठ्ठल खुसपुरे, महादेव मालेकार, प्रशांत माहुरे, देविदास ठेंगणे, सौ.बेबीताई मालेकर,रेखा वैद्य,सुनिता पत्रकार,सविता सोनटक्के, शिक्षक वृंद मुख्यध्यापक सुनील लोनगाडगे,आनंद पाटील, रामटेके,आवारी, रोहिणी मोहितकर, कर्मचारी, विद्यार्थी, पालकवर्ग उपस्थित होते.