श्रीराम मंदिर उभारण्याचे कार्य ऐतिहासिक- माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील

71

 

नीरा नरसिंहपूर दिनांक- :- बाळासाहेब सुतार,

आंतरराष्ट्रीय दर्जाचे राष्ट्रीय मंदिर म्हणून श्रीराम मंदिर उभारण्याचे ऐतिहासिक कार्य सुरू असून या कार्यासाठी आपले योगदान द्यावे असे प्रतिपादन माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी सोमवार दि. 25 रोजी इंदापूर शहरातील रामवेश नाका येथील श्रीराम मंदिर येथे अयोध्येतील श्रीराम मंदिर निधी संकलना संदर्भात आयोजित कार्यक्रमात केले.

राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक असलेल्या आयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण कार्यासाठी जनतेकडून निधी संकलनाचे कार्य सध्या देशात व राज्यात गावागावात उत्साहात सुरु आहे.या कार्यास गती यावी या उद्देशाने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यामध्ये 6 ठिकाणी बैठकांचे आयोजन केले आहे आज सायंकाळी पाच वाजता इंदापुरातील श्रीराम मंदिर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ या ऐतिहासिक व धार्मिक कार्यास सर्वांनी मदत करावी. राम मंदिर उभारणीस मदत करण्याची आपणास संधी मिळाली असून हे आपले भाग्य आहे. तालुक्‍यातील 86 हजार कुटुंबापर्यंत हा संदेश पोहोचून या ऐतिहासिक कार्यास आपले योगदान द्यावे. प्रत्येकाला असे वाटले पाहिजे की जेव्हा राम मंदिर उभारणार आहे त्यावेळी या मंदिरातील एक वीट किंवा येथील एक तरी कण हा आपल्या सहभागातून झाला आहे या भावनेतून या कार्याकडे आपण पाहावे. आपली लोकशाही प्रगल्भ लोकशाही असून न्यायमार्गाने श्रीराम मंदिर उभारणीचा निर्णय झाला आहे.’

यावेळी अतुल तेरखेडकर, लक्ष्मण महाराज कोकाटे, मंगेशराव मासाळ,दिलीपराव शिंदे, महादेव सोमवंशी, किरण गाणबोटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन भरत शहा, दूधगंगाचे चेअरमन मंगेश पाटील, ॲड. कृष्णाजी यादव, विश्व हिंदू परिषदेचे जी. बी. गावडे, इंदापूर तालुका कार्यवाहक लक्ष्मण कुंटे, भाजप शहराध्यक्ष शकील सय्यद, राजू शेवाळे, माजी नगरसेवक पांडुरंग शिंदे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरपरिषदेचे गटनेते कैलास कदम यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले. आभार माजी नगरसेवक शेखर पाटील यांनी मानले.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160