सोलापूर विद्यापीठाकडून होणारी पिळवणूक थांबवावी! श्रीकांत शिंदे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्याकडे केली निवेदनाद्वारे मागणी

123

 

सोलापूर ग्रामीण प्रतिनिधी // ऋषीकेश

महाराष्ट्रामध्ये कोरोना सारखे महाभयंकर विषाणूचा प्रादुर्भाव सुरू असताना ग्रामीण भागातील लोकांच्या हाताला कोणत्याही प्रकारचा रोजगार नाही सर्वसामान्य जनता व शेतकरी बांधव आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. सध्या महाविकास आघाडी सरकारने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून शासनाने शैक्षणिक अभ्यासक्रमाबाबत कोणताही आदेश निर्गमित केलेला नसताना,सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डाॅ. मृणालिनी फडणवीस मॅडम या मात्र आपला मनमानी कारभार करीत आहेत. त्यांनी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक सीए श्रेणीक शाह यांच्या सहीचे परिपत्रक प्रसिद्ध करून सोलापूर विद्यापीठाच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्य व संचालक यांना पाठविण्यात आले आहे. मुदतीत फी भरण्यासाठी कळविले आहे. सध्या परीक्षा घेण्याविषयी राज्य सरकारने कोणतेही आदेश दिले नसताना सुद्धा सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डाॅ. मृणालिनी फडणवीस मॅडम यांच्या सांगण्यावरून अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर व एमबीए या महाविद्यालयांनी विद्यार्थ्याकडून फॉर्म भरून घेवून परीक्षा शुल्क दिनांक 7 ऑगस्ट 2020 पर्यंत सोलापूर विद्यापीठाकडे जमा करावे असे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. आधीच कोरोना महामारीमुळे अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्य जनतेला व शेतकरी बांधवांना हा फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वरील परिस्थितीचा विचार करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची होणारी पिळवणूक होत आहे. ती थांबविण्यात यावी असे आदेश सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डाॅ. मृणालिनी फडणवीस मॅडम यांना देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदयजी सामंत यांच्याकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात असे म्हटले की , पंढरपूर तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांची मुले ही इंजिनिअरिंग, बी फार्मसी फार्मसी, आर्किटेक्चर व एमबीए या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहेत. वरील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेज मधून इमेलच्या माध्यमातून फी भरण्यासाठी तगादा लावण्यात येत आहे,,,पण महाविकास आघाडी सरकारने परीक्षा होणार नाहीत हे जाहीर केल्यानंतर ही फी बाबत विद्यार्थ्यांची पिळवणूक केली जात आहे त्यावर कुलगुरू फडणवीस मॅडम यांना आदेश देऊन विद्यार्थ्यांची पिळवणूक थांबवावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.