आज तालुक्याचे मुख्य असलेल्या देवरी येथील शासकीय तथा निमशासकीय कर्यालये व शाळा, महाविद्यालयात कोरोनाच्या दहशतीत पण तितक्याच उत्सहात प्रजासताकदिनाचा ७१ वा सोहळा साजरा.

91

गुणेश शाहारे
तालुका प्रतीनिधी
दखल न्यूज देवरी
आज तालुक्याचे मुख्य असलेल्या देवरी येथील शासकीय तथा निमशासकीय कर्यालये शाळा, महाविद्यालयात कोरोनाच्या दहशतीत पण तितक्याच उत्सहात प्रजासताकदिनाचा ७१ वा सोहळा ठरलेल्या वेळेनुसार साजरा करण्यात आला.
सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय देवरी येथे स. ८.०५ वाजे उपविभागीय अधिकारी मा. एस. डी. गायकवाड यांचे हस्ते एम.आर. गुप्ता अभियंता, एस.आर. मून अभियंता, एस.एस. पाटील अभियंता, जी.एम. राठोड वरिष्ठ लिपिक, डी.ए. डिकरुज, एच.एच.बाहे वाहनचालक, आर.एन. येवले, पी.एल. चौव्हाण, युगेश बिसेन कंत्राटदार, दखल न्युजचे तालुका प्रतीनिधी गुणेश शाहारे, यशवंत आओमकार वरिष्ठ नागरीक यांचे उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.