कोरची नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढणार तालुका प्रमुख रमेश मानकर

113

 

ऋषी सहारे
संपादक

कोरची ः नगरपंचायती मध्ये निवडणूकीची प्रक्रिया सुरू झाली आहे मात्र गेल्या पाच वर्षांत नगराचा पाहिजे तसा विकास झाला नाही. नगरपंचायतीची स्थापना झाल्यानंतर शहराचा विकास होईल अशी अपेक्षा होती मात्र पूर्वी जशी स्थिती होती तशीच स्थिती आजही बघायला मिळत असल्याने कोरची नगरपंचायत विकास आराखडा तयार करुन आगामी नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना 17 ही वार्डात उमेदवार उभे करणार असल्याचे शिवसेना तालुका प्रमुख रमेश मानकर यांनी स्पष्ट केले आहे.
गावात केवळ सिमेंट कॉक्रिट नाली सोडून अन्य कोणतीही विकास कामे झाली नाही. नालेसफाई, पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार करण्यासाठी व्यापार संकुले बांधकाम .
मागणी पाच वर्षाच्या कार्यकाळात अंदाजे दोन ते अडीच वर्षच कोरचीकरांना नळाचे पिण्याचे पाणी बरोबर नाही बाकी दिवस तर नळयोजना कधी सुरू तर कधी बंद अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील काही प्रभागांमध्ये अजूनही पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीरच आहे. नाले सफाई पाहिजे त्या प्रमाणात कोनत्याही प्रभागांमध्ये झाली नसल्याने डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे तर बाधकांम करण्यात आलेल्या नालीचे नियोजन बद्द बांधकाम न केल्याने नालीचे पाणी घरात घुसून नासाडी करीत आहे . कोरची ग्रामपंचायतीचे नगरपंचायती मध्ये रुपांतर झाल्याने नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या पण सत्ता पक्ष विरोधी पक्ष नेत्यानी कोरची नगरपंचायत विकास स्वप्न धुळीस मिळवले, त्यामुळे कोरची नगरपंचायत चा विकास आराखडा तयार करून शिवसेना कोरची नगरपंचायतीच्या विकासासाठी संपूर्ण ताकदीनिशी स्वबळावर निवडणुका लढल्या जातील असे स्पष्ट केले आहे
कोरचीकरांनी नगरपंचायती मध्ये भाजपला एक हाती सत्ता दिली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी बाकावर होते परंतु या पाच वर्षा कोणताच विकास केला नाही तिन्ही पक्षाचे पुढारी नगरपंचायत मध्ये असताना विकास केला नाही त्या मुळे या तिन्ही पक्षावर कोरची नगरातील मतदारांचा विश्वास नाही त्या मुळे आगामी नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनावर लोकांच्या विश्वास व्यक्त केला आहे, त्या मुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, कॉग्रेस आघाडी भाजप, शिवसेना अशी रंगत निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.