राजाराम खां.पोलीस स्टेशन च्या वतीने खांदला येथे प्रोजेक्ट प्रगती व प्रोजेक्ट विकास कार्यक्रम – जात प्रमाणपत्र व आधार कार्ड वितरण

52

 

रमेश बामनकर/अहेरी तालुका प्रतिनिधी

अहेरी:- जिल्हा पोलीस दलाच्यावतीने उप पोलीस स्टेशन राजाराम (खां) अंतर्गत येणाऱ्या मौजा – खांदला या अतिदुर्गम गावात दि.25 जाने.2021 रोजी प्रोजेक्ट प्रगती तसेच प्रोजेक्ट विकास अंतर्गत मा. श्री. अंकित गोयल पोलीस अधिक्षक गडचिरोली , श्री सोमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी यांच्या मार्गदर्शनाखाली जात प्रमाणपत्र व आधार काॅर्ड वितरण कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रम प्रसंगी मा. श्री. बजरंग देसाई उपविभागीय पोलिस अधिकारी अहेरी उपस्थितीत होते. तसेच उपपोलीस स्टेशन राजाराम चे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे , पो.उपनि. विजय कोल्हे , पो. उपनि. गणेश कड व पोलीस स्टेशनचे समस्त कर्मचारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सदर कार्यक्रम प्रसंगी क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरद्वारे पुष्पगुच्छ अर्पण करून कार्यक्रमची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या पुष्पगुच्छद्वारे सत्कार करून गावातील 20 नागरिकांना जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तसेच 20 आधार काॅर्ड मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या प्रसंगी मा. सौ. एस.एस. सडमेक मॅडम (ग्राम सचिव खांदला) , मा. सौ. वंदना अलोने (ग्रा.पं. सदस्य खांदाला) , उपस्थित होत्या. त्यानंतर मा. SDPO बजरंग देसाई यांनी आपले मनोगतातून नागरिकांच्या विकासासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. तुमच्या गावातील सर्व नागरिकांना जातीचे दाखले मिळाले पाहिजे याकरिता आम्ही प्रयत्नशील असून जातीच्या दाखल्यासाठी लागणारे कागदपत्रे आपण पोलीस स्टेशनला जमा करावे असे सांगितले सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रभारी अधिकारी भोरे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता जिल्हा पोलिस कर्मचारी तसेच SRPF चे कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पो.शिपाई वनकर यांनी केले असून पो. उपनि कोल्हे यांनी आभार व्यक्त केले. सदर कार्यक्रम प्रसंगी गावातील नागरिक , महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम शांततेत पार पाडण्यात आले.