रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत २५१ वाहन चालकांची नेत्र तपासणी

67

 

अकोट ता.प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

स्थानिक रोटरी नेत्र रुग्णालयात २५१ वाहन चालकांची नेत्र तपासणी करण्यात आली. हया वर्षी अकोट रोटरी, पोलीस स्टेशन अकोट, जेसीआय अकोट व शेतकरी मोटर्स च्या संयुक्त् विदयमाने राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत असुन हया वर्षी वाहन चालकांची आवश्यकता लक्षात घेऊन हा प्रकल्प् राबविण्यात आला. हया प्रकल्पा करीता उदघाटक म्हणुन डिस्ट्रीक्ट् गव्हर्नर शब्बीरजी शाकीर ,प्रथम महीला जुमाना शाकीर, अकोट पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष महल्ले, आरटीओ इंस्पेक्ट्र अमोल खेडकर, ग्रामीण पोलीस स्टेशनचे PSI डाखोरे , असीस्टंट गव्हर्णर राजीवजी नथ्थानी तथा खामगांव रोटरीचे पदाधिकारी उपस्थीत होते.
आज रोजी प्रत्येक गाडीचा चालक फार महत्वाचा भाग असुन त्यांच्या नेत्रांची नियमीत कालांतराने तपासणी करने फार महत्वाची आहे कारण की बरेच चालकांना रंग दृष्टीहीनता, काचबींदु, मोतीबींदु तसेच दुर व जवळ दृष्टीहीनाता नेहमी पाहण्यास मिळते. ९०% अपघात हे त्या वाहकांच्या हलगर्जी पणा मुळे होतांना दिसतात.त्यामुळे वाहन चालकांच्या डोळयांचे आरोग्य् चांगले रहावे तसेच त्यांचा दृष्टीदोष लक्षात यावा हया उदधेषाने हा प्रकल्प् आयोजीत केला गेला. हया वेळी असे लक्षात आले की बरेच लोकांना चष्मे लावण्याची गरज आहे,१५ वाहन चालकांना मोतीबिंदु काचबिंदु शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. तसेच ३ वाहन चालकांना रंग दृष्टीदोष असलयाचे आढळुण आले. हया प्रकल्पाचे आयोजन पाहुन डिस्ट्रीक्ट् गव्हर्णर शब्बीरजी शाकीर, ठाणेदार संतोष महल्ले व आरटीओ अमोल खेडकर यांनी अशा प्रकारच्या अभिनय आयोजना बद्द्ल आयोजकांचे कौतुक केले.हया नंतर काही दिवसातच अपघात विमा जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे.डॉक्टर मोरखडे अकोला यांनी आपली सेवा प्रदान केली
हया कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता राेटरी हॉस्पिटलचे नंदूभाऊ, पवित्रकार ,पोलीस हेड कॉन्सटेबल विश्वनाथ शेंडे, पोलीस कॉन्सटेबल गणेश फोकमारे, आशिष नांदोकार, सुनिल नागे, गोपाल निमकर्डे तसेच अकोट रोटरीचे माजी अध्यक्ष राजकुमार गांधी, विजयजी झुनझुनवाला ,नंदकिशोर शेगोकार , संजय बोरोडे, अनंतराव काळे, संदीप भुस्क्ट , उदधवराव गणगणे, अरविंद गणोरकार, प्रमोद लहाने,दिलीपजी चावडा , जेसीआयचे अध्यक्ष नितीन शेगोकार, उपाध्यक्ष निलेश इंगळे, प्रकल्प् प्रमुख अभिषेक दुबे, शेतकरी मोटर्स चे कृष्णाजी नाथे, अजिंक्य नाथे, विनोद कडु, रुपेश डांगरे, यांनी मोलाचे सहकार्य केले.या सर्वांचे आभार रोटरीचे सचिव शाम शर्मा यांनी मांनले अशी माहीती अकोट रोटरीचे जनसंपर्क अधिकारी कल्पेश गुलाहे कळवितात.