.पो.स्टेशन रेगुंठा येथे कार्यरत पोलीस जवान गौतम गवई (सर्पमित्र) यांनी ४८४ सापांना दिले जीवदान – मा.संदीप पाटील पोलीस उप महानिरीक्षक यांच्या वतीने शुभेच्छा पत्र देऊन गौरव

138

 

संपादक // जगदिश वेन्नम

गडचिरोली :- सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा उप पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस शिपाई /४१८०गौतम गवई (सर्पमित्र) यांनी आजपर्यन्त विषारी आणि बिनविषारी असे एकूण ४८४ सापांना जीवदान दिले आहेत.
ही बातमी सर्व प्रथम दखल न्युज भारत ने प्रसिद्ध केले होते
सदर पोलीस जवान हे गडचिरोली पोलीस दलात सण २०१२ साली भरती झाले आहेत.त्यांनी जिल्ह्यातील अति संवेदनशील देचलीपेठा,रेगुंठा सारख्या भागात कर्त्यव्य बजावत असताना मण्यार, नाग, वेल्यासाप असे अति विषारी आणि बिनविषारी सापांना पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडून त्या सापांना जीवदान दिले.
साप हा प्राणी निसर्गाचाच एक भाग आहे.त्यांना जीवे न मारता जंगलात सोडून द्यावे.असे पोलीस जवान तथा सर्पमित्र गौतम गवई यांनी आपली सेवा कार्यरत पोलीस स्टेशन हद्दीतील समस्त नागरिकांना आवाहन करीत आहे.