तिघाडी सरकार विरोधात भाजप आक्रमक भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मोर्च्याचे आयोजन

93

 

सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी भंडारा-ऋग्वेद
भंडारा-
शेतकरी, शेतमजूर,दुध उत्पादक, भंडारा उपजिल्हा रुग्णालयातील जळीत कांड,कोरोना काळातील वीजबिल व विविध मागण्यांसाठी भंडारा जिल्हा भाजपच्या वतीने माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली व हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत
भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढुन तीव्र निषेध करण्यात आला.
दूध उत्पादक शेतकर्‍यांचे दीड वर्षांपासून थकित असलेले चुकारे त्वरित द्या, धानखरेदीतील भ्रष्टाचार थांबवा, कामगारांना कल्याण योजनेचा लाभ द्या, कोरोना काळातील वीजबिल कमी करा, पूरपीडितांना योग्य मदत द्या, नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना योग्य मदत द्या, 10 निर्दोष बालकांच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर तत्काळ कठोर कारवाई करा, या व अशा अनेक मागण्यांसंदर्भात आज भंडारा जिल्हा भाजपाच्या वतीने करण्यात आला.
याप्रसंगी खासदार श्री सुनीलभाऊ मेंढे, जिल्हाध्यक्ष श्री शिवरामजी गिऱ्हेपुंजे, संघटन मंत्री मा.श्री उपेंद्रजी कोठेकर, माजी खासदार श्री शिशुपालजी पटले, माजी आमदार चरणभाऊ वाघमारे, माजी आमदार श्री बाळाभाऊ काशिवार, माजी आमदार श्री रामचंद्रजी अवसरे, श्री तारिकजी कुरेशी, श्री संजयजी भेंडे, आणि इतरही सहकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी मोर्चेकरांना संबोधित करतांना आमदार डॉ परिणय फुके यांनी मांडलेले मुद्दे असे:
– माजी मुख्यमंत्री आणि आपले सर्वांचे नेते मा. श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात असलेल्या आपल्या भाजपाच्या सरकारने भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी निर्णय घेतले. या जिल्ह्याचा विकास केला.
– परंतु हे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून आपल्या जिल्ह्याच्या बाबत दूजाभाव केला जात आहे. येथील सत्ताधारी लोकप्रतिनिधी फक्त सुढभावनेतून लोकांना त्रास देण्याचे काम करीत आहे.
– तीन पक्षांचे हे सरकार आहे. तीन पायांची कोणतीही वस्तू जशी जास्त वेळ टिकून राहत नाही, तसे हे तीन पायांचे सरकार जास्त वेळ टिकणार नाही.
– महविकस आघाडी सरकार मधील मंत्री आणि आमदार फक्त स्वतःचे हित पाहत आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांची टक्केवारी ठरलेली आहे.
– अधिकाऱ्यांचा बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत आहे.
– नवीन भरती साठी फडणवीस सरकारने महापोर्टल सारखी पारदर्शक प्रक्रिया सुरू केली होती. या सरकारने हे काम खासगी संस्थेला दिले आहे. यामागील कारण काय? सरकारने याबाबत तातडीने खुलासा करण्याची गरज आहे.
– दुध उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत चुकारे त्वरीत देण्यात यावे. या सरकारला गरीब शेतकऱ्यांची, दूध उत्पादक शेतकऱ्यांची चिंता नाही. पश्चिम महाराष्ट्रातील लोकांची काळजी घेणारे हे सरकार आहे.
– धानखरेदी केंद्रावरील भ्रष्टाचार थांबवून दोषींवर कार्यवाही व टोकन क्रमांक नुसार धान खरेदी करावी. या भ्रष्टाचारात ज्यांचे हात गुंतलेले आहेत, त्यांचे बुरखे आम्ही जाहीरपणे फाडणार आहोत.
– कामगारांना कल्याण योजनेचा लाभ द्यावा. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील शेकडो कामगार आज या योजनेपासून वंचित आहेत.
– कोरोना काळातील विज बिलातील १०० युनिट प्रति महा प्रमाणे घरगुती विज बिल कमी करावे व शेतकऱ्यांना पुर्ण सुट द्यावी. शेतकरी, शेतमजुरांच्या हाताला काम नाही, अशा बिकट परिस्थितीत त्यांनी अव्वाच्या सव्वा येणारी वीज बिल भरायची कशी? या गरीब शेतकऱ्यांचे शोषण करताना या सरकारला लाज कशी वाटत नाही.
– पुरपिडीत नागरीक व शेतकरी यांना सरकारने अजून मदत दिलेली नाही. या जिल्ह्यातील सत्ताधारी लोकप्रतिनिधींना याबद्दल काहीच घेणे देणे नाही. ते आपल्या मस्तीत आहेत. आमच्या पुरपीडित बांधवांना आणि शेतकऱ्यांना सरकारने तातडीने योग्य मदत मिळावी. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान द्यावे.
– जिल्हा शासकीय रुग्णालयातील १० नवजात बालकांच्या मृत्युला दोषी असलेल्या व्यक्तींवर तातडीने कारवाई करण्यात यावी. सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
– महाविकास आघाडी सरकारने पूर्व विदर्भासाठी विशेष पॅकेज मंजूर करावे.