पिंपरी बुद्रुक येथे भाजपच्या वतीने ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये विजय झालेले उमेदवार व पराजय झालेले उमेदवार यांचा हार व फेटा बांधून सन्मान करण्यात आला.

ग्रामपंचायतीमध्ये पराजय झाला म्हणून आम्ही गप्प बसणार नाही गोरगरिबांच्या मदतीला सदैव प्रयत्न करीत राहणार संचालक संजय बोडके

402

 

नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी :-बाळासाहेब सुतार ,

पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे 2021 ला लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकी साठी भाजप पक्षाच्या वतीने निवडणुकी मध्ये विजय झालेले उमेदवार व पराजय  झालेले उमेदवार यांचा सन्मान भाजपच्या वतीने पॅनल प्रमुख व साखर कारखान्याचे संचालक संजय बोडके व माजी सरपंच आबासाहेब बोडके, सुनील बोडके, तुकाराम बोडके, निलेश बोडके, यांच्या हस्ते उमेदवारांचा हार व फेटा बांधून त्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी संचालक संजय बोडके म्हणाले की गेली दहा वर्षा मतदार बंधू-भगिनींनी आमच्या कुटुंबावर विश्वास दाखवला व दहा वर्ष सत्तेत ठेवले याबद्दल आम्ही मतदारांचा कधीही विसर पडू देणार नाही निवडणुकीमध्ये विजय आणि पराजय या दोन नाण्याच्या बाजू असतात विजय हा कोणाचा तरी ठरलेलाच असतो आम्ही विकासाच्या बाबतीत कोठेतरी कमी पडलो असेल त्यामुळे जनतेने आम्हाला सत्तेपासून दूर ठेवल्याने झालेला पराजय तो आम्ही मान्य केला आहे. पराजय झाला म्हणून आम्ही खचून जाऊ शकणार नाही गोरगरीब सामान्य शेतकरी तळागाळातील नागरिक यांना विश्वासात घेऊन इथून पुढेही अडचणीचे कामे केल्याशिवाय गप्प बसणार नाही संचालक संजय बोडके यांचे सत्कार प्रसंगी उद्गार या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती माजी संचालक व माजी सरपंच पांडुरंग नाना बोडके, विकास सेवा सोसायटी चे सदस्य सौदागर काटकर, संचालक संजय बोडके, माजी सरपंच आबासाहेब बोडके, निलेश बोडके, अण्णा सर, चंद्रकांत सुतार, उत्तम बोडके, दादा भाई शेख, ताजुद्दीन शेख, राजेंद्र शेलार, राजेंद्र मगर, वर्धमान बोडके, सिकंदर शेख, सोमनाथ मगर, तुकाराम बोडके,  सत्यवान गायकवाड, आप्पा साहेब सुतार, पप्पू रनदिवे, नागनाथ गायकवाड, पमु शेख, बाळासाहेब शेख, सौरभ सुतार, किशोर सुतार, अण्णा पाटील, आबा बोडके,सतीश बोडके, अजिनाथ बोडके, ज्ञानदेव सुतार, पिंटू (मेजर) बोडके, हनुमंत सुतार, प्रभाकर सुतार, विश्वनाथ लावंड, अर्जुन सुतार, सुरेश बोडके ,नानासो बोडके, लिजाम शेख, या सर्वच ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजय झालेले उमेदवार व पराजय झालेले उमेदवार यांचा हार व फेटा बांधून सन्मान करण्यात आला.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160