प्रशासन आपल्या दारी या अभियानाचा माहूरकरांनी लाभ घ्यावा.सिद्धेश्वर वरणगांवकर

120

माहूर प्रतिनिधी // पवन कोंडे

माहूर शहरातील जि.प.शाळा क्र.5 मध्ये दि.30 जाने.2021रोजी दु.1 वा.प्रशासन आपल्या दारी या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.या अभियानाच्या माध्यमांतून शहरातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण केले जाणार असल्याने नागरिकांनी विहित नमुन्यातील अर्जांसह नियोजित ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन तहसीलदार सिद्धेश्वर वरणगांवकर यांनी केले आहे.
नगर पंचायत,पंचायत समिती,पोलीस स्टेशन, तालुका कृषी अधिकारी कार्यालय,गट शिक्षण अधिकारी कार्यालय,भूमि अभिलेख कार्यालयासह ईतर कार्यालयाचे कार्यालयीन काम रखडले असेल अथवा काही समस्या निर्माण झाल्या असतील अशा नागरिकांनी विहित नमुन्यातील अर्जांसह अभियान स्थळी उपस्थित राहून आपल्या समस्या मांडायच्या आहेत, उपस्थित अधिकारी /कर्मचारी त्या समस्यांचे निराकार करणार असल्याची माहिती तहसीलदार वरणगांवकर यांनी दि.25 जाने.रोजी आपल्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.यावेळी पं.स.चे गटविकास अधिकारी युवराज मेहेत्रे,सार्वजनिक बांधकाम विभागचे उपअभियंता वसंत झरीकर,अव्वल कारकून संतोष पवार आदींची उपस्थिती होती.