श्री रेणुकादेवी महाविद्यालयाची विद्यार्थिनीने विद्यापीठ स्तरीय निबंध स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. .कुलगुरू करणार सन्मान

121

 

माहूर प्रतिनीधी // पवन कोंडे

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत
श्री रेणुकादेवी महाविद्यालयात कला शाखेच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या पूनम ज्ञानेश्वर चव्हाण हिने
‘माझे ध्येय भ्रष्टाचारमुक्त भारत’ या विषयावर केलेल्या निबंध लेखनाला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. कुलगुरू यांचे हस्ते प्रजासत्ताक दिनी तिचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक ज्ञानोबा मुंढे यांनी दिली आहे.
ग्रामीण भागातही प्रतिभेची वाणवा नाही, मात्र उचित व्यासपीठ मिळत नसल्याने ती प्रतिभा वाया जात आहे.परंतु महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौशल्य हेरून त्यांना त्या- त्या क्षेत्रात संधी देण्याचे मोठे कार्य श्रीरेणुकादेवी महाविद्यालय व्यवस्थापन पार पाडीत आहे, ही निश्चितच अभिमानास्पद बाब असून तशी संधी उपलब्ध करून दिल्या बद्दल पूनमने संस्थाचालक, प्राचार्य,प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे आभार मानले आहे.तिला मिळालेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड, सचिव संध्याताई राठोड, उपाध्यक्ष किशोर जगत, संचालक नकुल राठोड, प्राचार्य डॉ. एन. जे. एम. रेड्डी यांच्यासह सर्व शिक्षकवृंद व मान्यवरांनी अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.