अकोट अकोला रस्त्यावरून राष्ट्रवादी महिला काँग्रेस भडकली सार्वजनिक बांधकाम यांना दिले निवेदन. आंदोलनाचाही इशारा

70

 

अकोट ता.प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

कित्येक वर्षापासून आकोट ते अकोला महामार्ग रखडलेला आहे काम सुरू होऊन आता चार वर्षे झाले देखील, अनेक ठिकाणी सिमेंटीकरण काही अंतरावर झाले मात्र अकोट ते देवरी फाटा पर्यंत मार्ग हा सामान्य जनतेसाठी डोकेदुखी चा झाला आहे.
रस्त्यांमध्ये मोठ मोठे दगड व खड्डे असून प्रसूती महिला व दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांना अत्यंत घातक ठरत आहे .
वाहनामुळे रस्त्यावर प्रचंड धूळ असुन धुळी मुळे श्वसन संबंधित आजार, मणक्याचे व डोळ्यांचे आजार होत आहेत. त्यामुळे धुळीमुळे दिवसाही वाहनां चा अपघात होऊन आतापर्यंत बहुत जीवित व शारीरिक व आर्थिक हानी झालेली आहे.
तरी या मार्गातील तांत्रिक अडचण असलेली संबंधित विभागाने माहिती जाहीर करावी .याकरता आपण सात दिवसांच्या अवधी देत आहोत, अन्यथा सात दिवसांनंतर राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुका अकोट कडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची जबाबदारी ही संबंधित विभागाची राहील.
यावेळी निवेदन देतांना अकोट तालुका महिला अध्यक्ष सौ.शारदा कैलास थोटे, सौ.छायाताई कात्रे प्रदेश सरचिटणीस,सौ. वृंदाताई मंगळे जिल्हा उपाध्यक्ष ,सौ.सुषमाताई राठोड ,सौ.सुनिता ताई ताथोड आदी महिला उपस्थित होत्या.