वैरागड ग्राम पंचायत मध्ये कोणत्या पॅनलचा सरपंच होणार. – वैरागड वासीयांच्या चर्चेला उधाण.

356

प्रलय सहारे // प्रतिनिधी
वैरागड : – येथील ग्राम पंचायत निवडणूक 15 जानेवारी रोजी शांततेत पार पडली. झालेल्या निवडणुकीत तीन पॅनल यांनी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले. सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होताच कोणत्या पॅनलचा सरपंच होणार अशी चर्चा वैरागड वाशियांमध्ये रंगू लागली आहे.

येथिल सामाजिक कार्यकर्ते भास्कर बोडणे प्रणित लोक विकास मंच पॅनलचे भास्कर बोडणे, छानू मानकर, संगीता मेश्राम, रेखा भैसारे, मनीषा खरवडे, प्रतिभा बनकर असे एकूण सहा उमेदवार निवडून आले. बलराम उर्फ भोलू सोमनानी प्रणित शिवशाही पॅनलचे गौरी सोमनानी, शीतल सोमनानी, दिपाली ढेंगरे, आदेश आकरे असे चार उमेदवार तर माजी सभापती विश्वनाथ भोवते प्रणित आपला गाव आपला विकास पॅनलचे सत्यदास आत्राम, संगीता पेंदाम असे दोन उमेदवार आणि अपक्ष म्हणून चंद्रवीलास तागडे असे एकूण तेरा सदस्य ग्राम पंचायतीत निवडून आले.

तेरा सदस्य असलेल्या वैरागड ग्राम पंचायत मध्ये सरपंच पदासाठी सात सदस्यांची आवश्यकता आहे. लोक विकास मंच पॅनलचे सहा उमेदवार असून सरपंच पदासाठी एका उमेदवाराची आवश्यकता आहे. तर शिवशाही पॅनल आणि आपला गाव आपला विकास पॅनल एकत्र होत असल्याची गावात जोरदार चर्चा होत असल्याने या पॅनलचे सुध्दा सहा उमेदवार होत आहे. दोन्ही पॅनलला सरपंच पदासाठी एकच सदस्याची आवश्यकता असल्याने अपक्ष म्हणून निवडून आलेले चंद्रविलास तागडे या  सदस्याला आपल्याकडे खिचण्याची  शर्यत दोन्ही पॅनल प्रयत्न करीत आहे.
अपक्ष उमेदवार तागडे कोणत्या पॅनलकडे जाईल अशी उत्सुकता नागरिकांमध्ये लागली असतांना कोणता पॅनल एकमेका विरोधकांचे सदस्य फोडून आपल्याकडे खिचण्याचे राजकारण खेळातील काय अशी खमंग चर्चा गावातील आणि परिसरात मोठ्या जोर-शोर मध्ये चालली आहे.