महसूल विभागाने केली पुन्हा अवैध रेती तष्करां वर कडक कारवाई

79

प्रशांत चरडे,
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,

प्रसारमाध्यमात घुग्घुस येथील रेती घाटांवर होत असलेल्या अवैध रेती तस्करी च्या बातम्या प्रकाशित होताच जिल्ह्यातील महसूल विभाग खडबडून जागा झालेला दिसून येत आहे. याच कडी मध्ये 14 जानेवारी रोजी केलेली चोविस ट्रॅक्टर वरील दंडात्मक कारवाई असो की 22 जानेवारी रोजी संध्याकाळी केलेली मार्डा नदीघाटा वरील दोन ट्रॅक्टर वरील कारवाई असो या धडक कारवाईमुळे मात्र रेती तस्करांचे कंबरडेच मोडले असल्याचे दिसून येत आहे.
दिनांक 22 जानेवारी रोजी मारडा येथील नदी घाटावरून अवैध रेती तस्करी करीत असताना घुग्घुस चे मंडळ अधिकारी किशोर नवले तसेच परिसरातील तलाठी दिलिप पिल्लाई, भोंगळे, तलार व दुवावार यांच्या टीम ने दोन ट्रॅक्टर पकडून दंडात्मक कारवाई केली व दोन्ही ट्रॅक्टर ग्रामपंचायत कार्यालय मारडा येथे जमा केले. तसेच दिनांक 25 जानेवारी रोजी सुद्धा नदी घाटा वरून रेती तस्करी करीत असताना पाठलाग करून तहसीलदार निलेश गौंड व त्यांच्या टीमने सकाळी साडे अकराच्या सुमारास बोंबले पेट्रोल पंप च्या बाजूला ट्रॅक्टर थांबवून कारवाई केली. सदर ट्रॅक्टर क्रमांक MH 34 L 5340 हा घुग्घुस येथिल दहा ट्रॅक्टर चे मालक असलेल्या कुख्यात रेती तस्कर मनोज सरोज यांच्या मालकीचा असून दंडात्मक कारवाई करून ट्रॅक्टर नायब तहसीलदार कार्यालयात जप्त करून जमा करण्यात आला आहे.
महसूल विभागाच्या या सतत होणाऱ्या कारवाईमुळे अवैध रेती तस्करांची धाबे दणाणले असून अनेकांनी आपले जप्त करण्यात आलेले ट्रॅक्टर अजूनही दंड भरून सोडविले नाही तसेच महसूल विभागाचे अधिकारी सुद्धा असत प्रसारमाध्यमां मध्ये येणारे बातम्यांमुळे तसेच वरिष्ठांच्या कारवाईच्या बडगा येईल या भीतीने का होईना या तस्करांच्या कारवाया रोखण्यात मजबूर झाल्याचे दिसून येत आहे. समोरच्या भविष्यात अधिकारी आणि तस्कर यांचे इंद्राजाल तूटण्यास मदत होते की काय हे लवकरच दिसून येईल अशी चर्चा जनमानसात आहे.