नागपंचमीच्या पूर्वसंध्येला नाचोना येथून अवैध देशी दारु जप्त

172

दर्यापूर(तालुका प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
तालुक्यातील खल्लार पो स्टे अंतर्गत येणाऱ्या नाचोना येथील 30 वर्षीय इसमाकडून काल 24 जुलैला संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास खल्लार पोलिसांनी 960 रुपयांच्या 16 अवैध देशी दारुच्या पावट्या जप्त केल्या
खल्लार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल 24 जुलैला नागपंचमीच्या पूर्वसंध्येला नाचोना येथील निलेश विश्वनाथ सदाशिव वय 30 वर्ष याने अवैध देशी दारु विक्रीकरिता आणली असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार ठाणेदार अभिजित अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे कॉ राजु विधळे, अविनाश ठाकरे यांनी नाचोना येथे जाऊन निलेश सदाशिव याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरुन 960 रुपयाच्या 16 देशी दारुच्या पावट्या आढळून आल्या पोलीसांनी तो मुद्देमाल पंचासमक्ष ताब्यात घेऊन जप्त केला असून निलेश सदाशिव याच्याविरुध्द मुदाका 65 (ई)नुसार गुन्हा दाखल केला याआधीही निलेश याच्याकडून पोलिसांनी अवैध देशी दारु पकडून जप्त केली होती