घुग्गुस येथे आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत मकरसंक्रांत उत्सव व सांस्कृतिक महिला संमेलन पाच हजार महिलांच्या उपस्थितीत थाटात संपन्न महिला महोत्सवातून महिलांच्या कला गुणांना वाव – आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे मनोगत

262

 

प्रशांत चरडे,
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,

घुग्गुस येथील प्रयास सभागृहात मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत मकरसंक्रांत उत्सव व सांस्कृतिक महिला संमेलनाचे आयोजन शनिवार दिनांक 23 जानेवारी 2021 रोजी व रविवार दिनांक 24 जानेवारी 2021 रोजी या दोन दिवशी आयोजित करण्यात आले होते .
घुग्गुस येथे आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव तथा मकरसंक्रांत उत्सव व सांस्कृतिक महिला संमेलनाचे उदघाटक आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार माजी अर्थ व नियोजन व वनमंत्री तथा अध्यक्ष विधी मंडळ लोक लेखा समिती महाराष्ट्र राज्य, कार्यक्रमाच्या अध्यक्ष्या सौ. उमाताई खापरे अध्यक्ष भाजपा महिला आघाडी महाराष्ट्र, विशेष अतिथी देवराव भोंगळे भाजपा जिल्हाध्यक्ष व माजी जिल्हापरिषद अध्यक्ष चंद्रपूर, सौ. संध्याताई गुरनुले, अध्यक्ष जिल्हापरिषद चंद्रपूर, वनिताताई कानडे उपाध्यक्ष भाजपा महिला आघाडी महाराष्ट्र, कु. अल्काताई आत्राम अध्यक्ष भाजपा महिला आघाडी चंद्रपूर, राहुल पावडे उपमहापौर, नामदेव डाहुले भाजपा तालुका अध्यक्ष, सौ. नितुताई चौधरी माजी जिप महिला व बालकल्याण सभापती चंद्रपूर, विवेक बोढे भाजपा युवमोर्चा जिल्हामंत्री चंद्रपूर, प्रमुख अतिथी माजी उपसभापती पंस चंद्रपूर निरीक्षण तांड्रा, माजी ग्रामपंचायत सदस्य साजन गोहणे,सिनू इसरप, प्रकाश बोबडे, विनोद चौधरी जिल्हा उपाध्यक्ष वाहतूक आघाडी चंद्रपूर, हसन शेख तंमूस अध्यक्ष घुग्गुस हे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
शनिवार दिनांक 23/1/2021 रोजी दुपारी 12 ते 5 वाजेपर्यंत प्रथम दिवशी स्त्रियां करिता खेळाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले होते.
यावेळी 1) रांगोळी स्पर्धा 2) निंबू चम्मच स्पर्धा 3) बोरा रेस स्पर्धा 4) रस्सी खेच स्पर्धा 5) संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेत मोठ्या संख्येत महिला स्पर्धकांनी भाग घेतला होता. रविवारला दिनांक 24/1/2021 रोजी सायंकाळी 5 वाजता द्वितीय दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उदघाटन आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार माजी अर्थ व नियोजन मंत्री महाराष्ट्र यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार म्हणाले आपल्या जीवनात सांस्कृतिक वारसा लाभला आहे. घुग्गुस शहराच्या माता बहिणी साठी एक मंच उपलब्ध करून दिल्या बद्दल महिला आयोजकांचे मी हृदयापासून आभार मानतो. हा कार्यक्रम बघताना महिलांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत होते ,असेच हास्य 365 दिवस ही राहो महिला घरीच काम करून घरचांची सेवा करतात परंतु त्या घरा बाहेर येऊन एकत्रित रित्या आपल्या कला गुणांना या ठिकाणी सादर करून दाखविले त्यामुळे महिलांना ऊर्जा मिळते अश्या रीतीने घुग्गुस शहरातील महिला समोर जाऊन प्रगती करणार अशी आशा व्यक्त करतो असे ते म्हणाले. यावेळी उमाताई खापरे अध्यक्ष भाजपा महिला आघाडी महाराष्ट्र या म्हणाल्या आज स्त्री शक्ती ही काय असते हे या जमलेल्या मोठ्या महिलांच्या जनसमुदायने दाखवून दिले आहे. आज महिला विविध क्षेत्रात काम करीत आहे आज महिलांचे पूर्वीचे दिवस गेले आहे. घुग्गुस शहरात विविध राज्यातील विविध भाषेच्या महिलांचे दर्शन मला घडले असे त्या म्हणाल्या. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले आम्ही घुग्गुस शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवितो महिलांसाठी स्पर्धा कार्यक्रम घेतो या कार्यक्रमात मोठ्या संख्येत महिला सहभागी होतात. घुग्गुसच्या विकासात आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार माझे गुरुवर्य यांचे मोठे योगदान आहे. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त घुग्गुस येथे महाआरोग्य शिबीर घेतो व घुग्गुस येथील मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या माध्यमातून गोर गरीब जनतेची सेवा करीत कामे कामे करतो तसेच प्रयास अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोयायटी घुग्गुस च्या माध्यमातून महिलांच्या बचती साठी पुढाकार घेतला या सोसायटीत 3000 महिला सदस्य आहेत असे ते म्हणाले.
यावेळी 1) एकल नृत्य 2) समूह नृत्य 3) फॅन्सी ड्रेस चा कार्यक्रम घेण्यात आला यात मोठ्या संख्येत महिला स्पर्धाकांनी भाग घेतला होता.
तसेच “हळदी कुंकू, वाण वाटप” तथा स्नेहभोजनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन- भाजपा महिला आघाडी तथा प्रयास सखी मंच घुग्गुसच्या वतीने करण्यात आले होते.