खेड तालुक्यातील कळंबणी उपजिल्हारुग्णालय येथे कोरोना लसीकरणाचा दापोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्मा. श्री. योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीत शुभारंभ

88

 

प्रतिनिधी : विनोद क्षीरसागर.

खेड : दापोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्मा. श्री. योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीत शुभारंभ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. सदर लसीकरणानंतर लाभार्थींजवळ त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली व त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच लसीकरण करताना घ्यावयाची काळजी, लसीच्या सुरक्षेविषयी विशेष सूचना वैद्यकीय अधिकारी यांना आमदार श्री. योगेशदादा कदम यावेळी दिल्या. सदर शुभारंभप्रसंगी खेड पंचायत समिती सभापती श्री. विजय कदम, खेड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. श्री. शेळके, उपजिल्हारुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.श्री. सगरे, उदयोजक श्री. शैलेश कदम, भरणे ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सदस्य श्री. महेश जगदाळे, श्री. कौशल चिखले, खेड तालुका आयटी सेलचे तालुकाअधिकारी श्री. दर्शन महाजन, भरणे जि.प. गटाचे उपविभागप्रमुख श्री. विजय बेलोसे यांसहित उपजिल्हारुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी वर्ग व लसीकरणाचे लाभार्थी उपस्थित होते.

*दखल न्यूज भारत*