विद्या निकेतन शाळा कोंढाळा येथील विध्यार्थ्यांचे गणित विषयातील भवितव्य अंधारात -दोन वर्षांपासून कायम शिक्षकाविना वर्ग सुरु

139

सत्यवान रामटेके(देसाईगंज ग्रामीण तालुका प्रतिनिधी)
कोंढाळा येथील विद्या निकेतन शाळेतील विध्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असून गेल्या दोन वर्षांपासून शाळेमध्ये गणित विषयाचे कायम शिक्षक नाही.
सध्या स्थितीत सातवी ते दहाव्या वर्गासाठी कंत्राटी कर्मचाऱ्याच्या भरवशावरच चारही वर्ग सांभाळण्याचा भार दिला असल्याने कसे-बसे शिक्षण देण्याचे काम विद्या निकेतन शाळेने चालविले आहे.बऱ्याच महिन्यापासून शिक्षक वर्गांची अदलाबदल करून चालढकल करीत गणित विषयाचे धडे गिरविल्या जात होते.नंतर काही महिन्यात शिक्षक वर्गांच्या नाकी नऊ आल्याने वर्ग सांभाळणे कठीण झाल्याने वरीष्ठ स्तरावरून शिफारस करून गणित विषयाचे कंत्राटी कर्मचारी विध्यार्थ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले.
याच कंत्राटी कर्मचाऱ्यावर आता चार वर्गाचा भार असल्याने इकडे आड तिकडे विहीर असे झाल्याचे कळते.शाळेमध्ये मुख्याध्यापकही कायम नसल्याने अतिरिक्त पदभार असलेले मुख्याध्यापक अजूनही कार्यरत आहे.त्यांच्याकडे शिक्षकांची कमतरता असल्याने त्यांनाही वर्ग शिकवणे अवघड जात असल्याचे बोलले जात आहे.
विद्या निकेतन शाळेमध्ये एकूण विध्यार्थी संख्या १९८ एवढी आहे.यात पाच ते दहावीचे वर्ग भरविल्या जाते.शिक्षकांची अशा प्रकारची कमतरता असेल तर विध्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात असल्याची शक्यता नाकारता येणार नाही.कंत्राटी कर्मचारी यांच्यावर जास्त भार देऊन आपण रिकामटेकडे राहावे व विध्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात घालून हातावारे करावे ही शरमेची बाब आहे.
विद्या निकेतन शाळा ही अनुदानित शाळा आहे. शाळेकडे कुणाचेही लक्ष नसल्याने वेळेवर शाळेत शिक्षक हजर नसल्याचेही बोलल्या जात आहे.कधी शिक्षक शाळेत येतात तर कधी बुट्टी मारीत असतात.