महिला लैंगिक शोषणविरोधी केंद्राची चार सदस्यीय कमिटीवर मंगल देवकर यांची निवड

99

आळंदी दि.२५ प्रतिनिधी : भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामधील खराबवाडी, चाकण ( ता. खेड ) येथील मंगल हनुमंत देवकर यांची केंद्राच्या चार सदस्यीय कमिटीवर निवड केली आहे. महिला लैंगिक शोषणविरोधात गठीत केलेल्या
महिला लैंगिक शोषण तक्रार समिती” ( Sexual Harrasement of Women at work place ) या कमिटीवर सदस्यपदी ही निवड करण्यात आली आहे. एनडीआरएफच्या बटालियन पाचचे कमांडन्ट अनुपम श्रीवास्तव यांनी याबाबत निवडीचे पत्र जारी केले आहे.

महिला काम करीत असलेल्या ठिकाणी लैंगिक शोषण होण्याच्या अनेक घटना समोर आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने सदर कमिटी गठीत केली आहे. एनडीआरएफच्या बटालियन 4 च्या कमांडन्ट रेखा नांबियार ( तामिळनाडू ) या चेअरमन असणाऱ्या या कमिटीत इतर तीन सदस्य इतर राज्यातील आहेत. डेप्युटी कमांडन्ट पवन देव गौर, डेप्युटी कमांडन्ट दीपक तिवारी, मंगल हनुमंत देवकर ( महाराष्ट्र ), एस. के. करीम अशी ही कमिटी गठीत करण्यात आली आहे. महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू असे या समितीचे कार्यक्षेत्र आहे.

कामाच्या ठिकाणी होणारे महिलांचे लैंगिक शोषण विरोधात ज्या तक्रारी किंवा विषय असतील त्यावर ही सरकारी कमिटी काम करते. महिलांसंदर्भात असणाऱ्या लैंगिक शोषणाबाबत ही कमिटी निराकरण करून त्यावर उपाययोजनांची काम सरकारी कमिटी म्हणून काम करते व त्याचा अहवाल गृह विभागाला पाठवते. या समितीची त्रैमासिक बैठक होते.

मंगल हनुमंत देवकर यांची या महत्वपूर्ण कमिटीवर निवड झाली असून या निवडीने मंगल देवकर यांनी महिलांबाबत केलेल्या कामाची दखल थेट भारत सरकारच्या गृह विभागाने घेऊन त्यांची या कमिटीवर निवड करून त्यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे.