पादुका संस्थान च्या वतीने दोन बहिनींचा सत्कार

120

 

अकोट ता. प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

श्री गजानन महाराज पादुका संस्थान मूंडगाव च्या यात्रा महोत्सवाचे औचित्य साधून मुंडगावातील दोन बहिणींचा पादुका संस्थान येथे विश्वस्त मंडळ, व शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत ह. भ. प. श्री गजानन महाराज हिरुळकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
संतनगरी मुंडगाव येथील श्री गजानन सरिसे यांच्या दोन मुली स्पर्धा परीक्षा देवुन शासकीय सेवेत रुजू झाल्या आहेत. कु. भाग्यश्री गजानन सरिसे ही बृहन्मुंबई महानगर पालिका व कु. प्रियंका गजानन सरिसे हीचे स्टाफ सिलेक्शन द्वारे नियुक्ति झाली आहे.
पादुका संस्थानच्या संत बायजाबाई ग्रंथालयात अभ्यास करून या दोघी बहिणींनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली असून सर्वत्र या दोघी बहीणीचे कौतुक होत आहे.