मौजा घोघरा महादेव मंदिर पेच नदी पात्रात डुबुन गेला एका मुलाचा जीव

281

 

पारशिवनी तालुका प्रतिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

पारशिवनी(ता प्र): – पारशिवनी पोलीस स्टेशन च्या हदीत येणार्या मौजा घोघरा महादेव मंदिर पेच नदी च्या पात्रता दर्शना करिता आले एका मुलाचा जीव गेल्याची घटना समोर आल्याने पारशिवनी पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन त्याला ग्रामीण रुग्णालयात पारशिवनी ला नेले असता डॉक्टरांनी मृतक घोषित केले असता पारशिवनी पोलीसांनी फिर्यादी शिवराज कपुरचंद श्रीवास वय ४१ वर्ष राहणार रावल अर्पाटमेंट प्लाॅट नंबर ८ , दस नंबर पुलिया लश्करीबाग नागपुर यांचा तक्रारी वरुन आकस्मिक मृत्यु च्या गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे .
मिळालेल्या माहिती नुसार आज रविवार दिनांक २४ जानेवारी ला सकाळी 11: 00 वाजता च्या सुमारास संपुर्ण परिवार व मित्र असे मिळुन अंदाजे ५० ते ६० लोक पारशिवनी घोगरा महादेव मंदिर येथे दर्शन करायला आले असता मित्रान सोबत जेवन केल्यानंतर दुपारी १२:३० वाजता च्या सुमारास मुल व परिवारात ले सदस्य पेच नदी च्या पात्रता आंघोळ करत असतांनी कुणी तरी पाण्यात डुबत आहे असे आवाज आले असता सर्व लोक नदी कडे धावले असता त्याच वेळी शिवराज कपुरचंद श्रीवास व यांचे मित्र त्या ठिकाणी पोहचले असता त्याच ठिकाणी शिवराज कपुरचंद श्रीवास यांचा मित्रांनी नदी मधुन अनुराग शिवराज श्रीवास यांना नदीच्या बाहेर काढुन ठेवले असता अनुराग शिवराज श्रीवास हा मुलगा बेहोशि मध्ये होता यावेळी शिवराज श्रीवास व यांचा मित्रांनी अनुराग श्रीवास या मुलाला पारशिवनी ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तापास करुन त्याला मृत्यु घोषित केले .
पारशिवनी पोलीसांनी फिर्यादी शिवराज कपुरचंद श्रीवास यांचा तक्रारी वरुन मर्ग क्रमांक ०५/२०२१ कलम १७४ चा गुन्हा दाखल करुन पुढील तपास पुलिस निरिक्षक संतोष वैरागडे यांचे मार्गदर्शनात पुलिस उप निरीक्षक ज्ञानबा पळनाते सह मुद्दस्सर जमाल,संदिप कडु,मेंघरे,
पुलिसानी सुरू केला आहे .