गोमनी नाल्यावर श्रमदानातून वनराई बंधारा बांधकाम – नेहरू युवा केंद्र तालुका मूलचेरा चा पुढाकार

85

 

रमेश बामनकर/अहेरी तालुका प्रतिनिधी

अहेरी :- मूलचेरा तालुक्यातील गोमनी नाल्यावर नेहरू युवा केंद्र गडचिरोली, युवा व क्रीडा मंत्रालय भारत सरकार, तालुका केंद्र मूलचेरा यांच्या पुढाकारातून “स्वच्छ गाव, हरित गाव” अंतर्गत स्वच्छता, जनजागृती व श्रमदान या मथाड्याखाली दि.२४ जाने.२०२१ रोजी नेहरू युवा केंद्र मूलचेरा तालुका युवा स्वयंसेवकाच्या वतीने गोमनी येथील वनराहीत श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला आहे. यातून जनतेला “पाणी अडवा-पाणी जिरवा” असा संदेश देण्यात येत आहे.येणारा उन्हाळा ऋतू असून पाळीव जनावरे आणि जंगली प्राणी यांना तहान भागविण्यासाठी मदत होईल आणि जमिनीतील पाण्याची पातळी वर येण्यास मदत होईल या उद्देशाने वनराई बंधारा बांधण्यात युवकांनी पुढाकार घेतला आहे.
या वेळी मूलचेरा तालुका युवा स्वयंसेवक खुशाल मडावी यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली युवा कार्यकर्ते शुभम, अविनाश, विकास, विजय, मिलिंद, श्रीकांत, चिरंजीव, सुरज, बंटी, शुभम, संजू, रवी, पवन, यांच्या सहकार्याने वनराई बंधारा बांधून त्या नाल्याची साफ-सफाई करण्यात आली आहे.