प्रकाश लक्ष्मण झोरे यांना राज्यस्तरीय विश्व समता समाजरत्न पुरस्कार.

136

 

प्रतिनिधी : निलेश आखाडे.

रत्नागिरी : रत्नागिरी धनगर समाज संस्था शाखा राजापूर तालुक्याचे अध्यक्ष मा.श्री .प्रकाश लक्ष्मण झोरे रा.नेरके ता. राजापूर गेली २५ वर्षे धनगर समाजाच्या व्यथा, प्रश्न व समस्या तळमळीने तसेच निस्वार्थी भूमिकेतून शासन दरबारी मांडत आहेत. त्यांच्या या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याची दखल समाजातील अनेक सामाजिक व राजकीय संघटना घेत आहेत. त्याचाच भाग म्हणून त्यांना राज्य स्तरीय पुरस्कार विश्व समता कला मंच लोवले, संगमेश्वर जिल्हा – रत्नागिरी राज्यस्तरीय सामाजिक संस्थेने राज्यस्तरीय विश्व समता समाजरत्न पुरस्कार देवून सामाजिक कार्याचा गौरव केला आहे .त्यांच्या पुरस्काराबद्दल सर्व स्थरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. समाज प्रतिनिधीनी त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.

दखल न्यूज भारत