डोंगरगाव भुसारी ग्रामपंचायतवर ग्राम विकास पॅनलचा झेंडा बीजेपी ला मोठा धक्का भाजपा गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख व भाजपा आरमोरी तालुकाध्यक्ष यांना गावातील गड राखण्यात अपयश

600

 

ऋषी सहारे
संपादक

आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव भुसारी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल नुकताच लागला या निवडणुकीमध्ये ग्राम विकास समर्थित महाविकास आघाडीचा झेंडा ह्या ग्रामपंचायतीवर लागला असून 9 ग्रामपंचायत सदस्य पैकी 7 ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास चे निवडून आल्याने या ग्रामपंचायत वर ग्रामविकासने निर्विवाद वर्चस्व स्थापन केले आहे सविस्तर वृत्त असे की आरमोरी पासून 5 किलो मीटर अंतरावर असलेले डोंगरगाव भु हे ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीमध्ये यापूर्वी भारतीय जनता पक्षाची संपूर्णपणे निर्विवाद सत्ता होती नऊपैकी 9 सदस्य हे बीजेपीचे होते परंतु या वर्षीच्या निकालांमध्ये या भाजपच्या गडाला सुरुंग लागून ग्राम विकास आघाडीचे सात उमेदवार निवडून आले ग्राम विकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व स्थापन केले आहे प्रामुख्याने डोंगरगाव भुसारी हे गाव भाजपाचे जिल्हा संपर्कप्रमुख व भाजपाचे तालुकाध्यक्ष यांचं गाव असल्याने या गावांमध्ये त्यांना स्वतःची सत्ता आणता आली नाही वार्ड क्रमांक एक मध्ये ग्राम विकास आघाडीचे प्रियंका भुकेश्वर कुथे हया निवडून आल्या तर गुरुदेव पार्टी व सार्वजनीक पार्टीचे सचिन कुथे व पपिता कोल्हे हे दोनच उमेदवार निवडून आणण्यात त्यांना यश प्राप्त झाले तर वार्ड क्रमांक दोन मध्ये ग्राम विकास आघाडीचे लोमेश लक्ष्मण सहारे, सुलोचना सुरेश ढोरे, छाया भास्कर खरकाटे यांनी एकहाती विरोधकांचा पराभव केला आणि निवडून आले तसेच वार्ड क्रमांक 3 मधून ग्रामविकास आघाडीचे अक्षय श्रीहरी ठाकरे,निलकंठ सुकाजी बगमारे आणि असून अनुसूचित जाती प्रवर्गातून कुमारी पूजा नीलकंठ चहांदे हे तीनही उमेदवार भरगच्च मताने निवडून आले या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षाकडून साम, दाम, दंड या सर्व शक्तींचा वापर करण्यात आला होता तरी पण या ठिकाणी बीजेपीच्या सत्तेला सुरुंग लावून ग्राम विकास आघाडीने मोठ्या प्रमाणात यश संपादन केले या निमित्ताने दिनांक 24 जानेवारी 2021 रोजी डोंगरगाव येथील नवीन बस स्टॉप आणि संपूर्ण गावामध्ये विजयी मिरवणूक काढण्यात आली. या विजय मिरवणुकीमध्ये ग्राम विकास आघाडीचे पदाधिकारी नानाजी राऊत, गंगाराम सेलोटे, धनंजय ढोरे, दामोदर राऊत, मोहन भुते, संदीप राऊत गुरुजी, निखिल धार्मिक प्रहार तालुकाध्यक्ष, संतोषजी सेलोटे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामकृष्ण कुथे ,लोचन ढोरे,,मधुकर राऊत महाजन, दीपक ठाकरे, सुरेश ढोरे,वामन राऊत, योगाजी अवसरे, वामन ठाकरे,माजी सैनिक ,प्रकाश ठाकरे दिवाकर बेद्रे, यादव माकडे ,सुधीर ठाकरे ,चंद्रशेखर शेंडे ,यशवंत गाडगे, रमेश लिंगायत माजी ग्रामपंचायत सदस्य,रमेश ढोरे,दीपक ढोरे,आणि ग्रामविकास पॅनल चे सर्व पदाधिकारी व गावकरी मंडळी या विजयी मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते हा ऐतिहासिक विजय असून ग्राम विकास आघाडी ही नेहमी गावाच्या विकासासाठी कार्य करीत राहील आणि डोंगरगाव हे गाव सुजलाम-सुफलाम बनवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहील असे ग्रामविकास आघाडीचे नेते यांनी सांगितले या विजय मिरवणुकीमध्ये फटाक्याची आतिषबाजी, लाडू मिठाईचे वाटप करून डीजेच्या तालावर नवजवान तरुण मंडळी आणि वृद्ध सुद्धा नाचताना दिसून येत होते. शेवटी बऱ्याच वर्षानंतर भाजपाच्या डोंगरगाव येथील गडाला ग्राम विकास आघाडीने सुरुंग लावून निर्विवादपणे सात उमेदवार निवडून आणून आपली सत्ता आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास यश प्राप्त केले. त्यामुळे संपूर्ण आरमोरी तालुक्यात डोंगरगाव भू.येथील निवडणुकीची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू असून भारतीय जनता पार्टीच्या समर्थीत पॅनलला दारुण पराभवाचा सामना करावा लागला असे बोलल्या जात आहे.