महाराष्ट्र राज्यात हाथरस प्रकरणाची पुनरावृत्ती गंभीर बाब

गोंदिया लैंगिक अत्याचार प्रकरणाला अनुसरून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घराला,प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वात बसपा कार्यकर्ता घेराव करणार! -- घटनाक्रमातंर्गत माहिती घेण्यासाठी बसपा प्रदेशाध्यक्ष अॅड.संदीप ताजने गोंदियाला जाणार,पिडित कुटुंबीयांची भेट घेणार... -- सामुहिक अपहरणाचा,सामुहिक लैंगिक अत्याचाराचा,सामुहिक कटाचा व सामुहिकपणे हत्येचा गुन्हा,ठाणेदारांनी दाखल केलाच नाही. -- सिबिआय तर्फेच तपास हवा.. --

324

संपादकीय
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक

गोंदिया अंतर्गत मरारटोली येथील अल्पवयीन विद्यार्थिनीवर करण्यात आलेल्या सामुहिक लैंगिक अत्याचाराच्या व घातपाताच्या प्रकरणाचे वास्तव्य,—“पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांनी मृतक मुलीच्या पिडित मातापित्यांची लेखी तक्रार न घेता किंवा त्यांचे म्हणणे न ऐकता,— सुरुवाती पासूनच सदर प्रकरणाला कलाटणी देण्याचा धाडसान्वये प्रकार केला व विद्यार्थीनीचा अपघात झाला असल्याचे दाखवून सामुहिक लैंगिक अत्याचार प्रकरणाला एनकेन प्रकारे दाबण्याचा पुरेपूर प्रयत्न केला असल्याचा,ठाणेदार प्रमोद घोंघे यांचा एकतर्फा चौकशी घटनाक्रम बरेच सांगून जातो आहे.

याचबरोबर विद्यार्थीनीच्या सामुहिक लैंगिक अत्याचार प्रकरणाला दाबण्याचा व कलाटणी मारण्याचा मोठा खेळ,राजकीय दबावात सुरू असल्याचे ठाणेदार प्रमोद घोंघे यांच्या,”पिडित कुटुंबीयांना अपमानास्पद वागणूक देण्याच्या व त्यांचे काहीही ऐकून न घेण्याच्या कार्यपद्धतीवरुन व भुमिका वरुन,लक्षात येते.

मात्र,अनेक प्रकारच्या शंकाकुशंकाना अनुसरून किंवा अनेक प्रकारच्या प्रश्नाला अनुसरून,मुद्दा हा उपस्थित होतो की,सामुहिक लैंगिक अत्याचाराचे व घातपातातंर्गत अल्पवयीन विद्यार्थिनीच्या मृतूचे गंभीर प्रकरण दाबण्यासाठी अधिकाऱ्यांसह,राजकीय नेत्यांचा संबंध आहे काय? किंवा प्रकरण दाबण्यास राजकीय नेते व सबंधीत अधिकारी सहभागी आहेत काय?यासंबंधाने सिबिआय तर्फे कसून चौकशी होणे आवश्यक आहे…

“लैंगिक अत्याचार प्रकरणा बाबतचे ठाणेदार प्रमोद घुगे यांचे आतापर्यंतचे असंवेदनशील तपास कार्य बघता,”सिबिआय शिवाय,…”अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाचा व घातपातातंर्गत अपघातान्वये मृत्यूचा,…योग्य तपास कुणीच करू शकत नाही,या मतापर्यंत मृतक मुलीचे पिता,धूरवस भोयर पोहचले आहेत.तद्वतच महाराष्ट्र राज्यातील कुठल्याही प्रकारची तपास यंत्रणा,”त्यांच्या मुलीच्या प्रकरणाचा योग्य तपास करील, असा विश्वास त्यांना अजिबात नाही..

धूरवस भोयर यांच्या मुलीच्या सर्व प्रकरणाकडे महाराष्ट्र राज्याचे बसपा प्रदेशाध्यक्ष अॅड.संदीप ताजने यांचे बारकाईने लक्ष असून,बसपा प्रदेशाध्यक्ष अॅड.संदीप ताजने हे प्रत्यक्ष गोंदिया येथे जाऊन पिडित धूरवस भोयर दापंत्याची लवकर भेट घेणार असल्याची व घटनाक्रमाची इतंभूत माहिती घेणार असल्याची माहिती बसपा प्रदेशाध्यक्ष यांनी,दखल न्युज भारत,सोबत भ्रमणध्वनी द्वारे संवाद साधताना दिली.

याचबरोबर बसपा प्रदेशाध्यक्ष अॅड.संदीप ताजने हे,मुलीच्या अत्याचार प्रकरणाची योग्य व सखोल चौकशी करण्यासाठी,आपल्या पदाधिकाऱ्यांसह व कार्यकर्त्यांसह,महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री नामदार अनील देशमुख यांच्या घराला घेराव करणार असल्याचे,”त्यांनी,दखल न्युज भारत चे मुख्य संपादक प्रदीप रामटेके यांच्या सोबत भ्रमणध्वनी द्वारे संवाद साधताना सांगितले….

बसपा प्रदेशाध्यक्ष अॅड.संदीप ताजने हे लैंगिक अत्याचार प्रकरणाचा अयोग्य तपास करणाऱ्या व धूरवस भोयरसह,त्यांच्या सहचारिणीला अपमानास्पद वागणूक देणाऱ्या सबंधीत अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी सुध्दा रेटून धरु शकतात….

गोंदिया रामनगर ठाणेदारांची पिडित परिवारातील सदस्यांना परेशान करणारी भुमिका व अपमानास्पद वागणूक देणारी मानसिकता अतिशय जहाल असून,पिडित परिवारातील सदस्यांवर अन्याय-अत्याचार करणारी आहे.

गोंदिया रामनगर पोलिस स्टेशनच्या ठाणेदारांनी अजूनही लैंगिक अत्याचारा संबंधात गुन्हा दाखल केला नसल्याने,त्यांच्या कार्यपद्धतीची व भुमिकांची संखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहकारी कुमार यश रामचंद्र गुप्ता,कुमार प्रथम जयेश चावडा,कुमार कार्तिक दिगंबर टेंबरे,कुमार निखील चंद्रकांत पिपरहेटे,यांना अजूनपर्यंत अटक न करणे,त्यांचे मोबाईल जप्त न करणे,त्यांची लैंगिक अत्याचारा संबंधाने व घातपातातंर्गत अपघाता नुसार चौकशी न करणे,हा ठाणेदाराच्या कार्यप्रणालीचा संवेदनहिन कार्यभाग,सामुहिक हत्याकांडाच्या प्रकरणाची व सामुहिक लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाची बरीच लपवाछपवी निदर्शनास आणते व सदर महत्त्वपुर्ण प्रकरणाची गंभीरता कमी करणारी त्यांची मानसिकता उघड पाडते.

मात्र,सामुहिकपणे कट रचणे,सामुहिकपणे अपहरण करणे,सामुहिकपणे लैंगिक अत्याचार करणे,सामुहिकपणे हत्या करणे,या संबंधाने गोंदिया येथील रामनगर पोलिस स्टेशनच्या ठाणेदारांनी अजूनही गुन्हा दाखल केला नाही… घटनाक्रमातंर्गत ४ दिवस उलटल्यानंतर ज्या ठाणेदारांनी आपल्या मनमर्जी प्रमाणे केवळ एका आरोपींवर अयोग्य नियमानुसार गुन्हे दाखल केले,त्या ठाणेदाराकडून योग्य कर्तव्याची व कारवाईची अपेक्षा करणे चुकीचे आहे.यामुळे या प्रकरणात राजकीय मुळे खोल रुजली असल्याचे म्हणने चुकीचे ठरु नये.म्हणूनच अल्पवयीन मुलीच्या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी सिबिआय तर्फे होणे आवश्यक वाटते.

महाराष्ट्रा सारख्या पुरोगामी राज्यात,सामुहिकपणे लैंगिक अत्याचार करुन हत्या करणाऱ्या गंभीर प्रकरणाला कलाटणी देण्याचा जो प्रकार पोलिस प्रशासना द्वारे सुरू आहे,तो प्रकारच खेदजनक,नैराश्यजनक तर आहेच,परंतू हाथरस प्रकरणाची पुनरावृत्ती करणारा ठरतो आहे.फरक येवढाच आहे हाथरस प्रकरणातील मुलीचा मृतदेह मध्यरात्री जाळण्यात आला होता तर गोंदिया प्रकरणातील मुलीचा मृतदेह गाढण्यात आलेला आहे.

मात्र,सामुहिक अपहरण करणे,लैंगिक अत्याचार करणे,हत्या करणे,अपघात झाला असल्याचे कटाद्वारे प्रकरण रेखाटने,सारख्या गंभीर प्रकरणाला,पोलिस प्रशासनाद्वारे पध्दतशीरपणे बगल देणे हा छडयंत्राचा भाग दिसतो आहे.