Home Breaking News आस्वलहुडकी येथे पसरली हगवणीची साथ दूषित पाण्यामुळे साथ पसरली असल्याची शक्यता

आस्वलहुडकी येथे पसरली हगवणीची साथ दूषित पाण्यामुळे साथ पसरली असल्याची शक्यता

144

अशोक खंडारे विभागीय प्रतिनिधी
कोरची मुख्यालयापासून सहा ते सात किलोमीटर अंतरावर असलेल्या आस्वलहुडकी येथे हगवनची साथ पसरली असून येथील बहुतेक लोकांना उल्टी, हगवन तसेच तापाचे लक्षण दिसून येत असल्यामुळे गावात खळबळ माजली आहे. अस्वलहुडकी येथे नल व बोरवेल चे पाणी पिण्याकरिता उपयोगात आणले जात आहे. असे लक्षण दूषित अन्न किंवा पाण्याने होत असते. अस्वलहुडकी येथील नागरिक तपासणीकरिता कोरची येथे येत असून त्यांना प्राथमिक उपाययोजना म्हणून पाणी उकळून पिण्याचे निर्देश ग्रामपंचायत अस्वलहुडकी यांच्याकडून देण्यात आले आहे.
ग्रामपंचायत अस्वलहुडकी चे सचिव दिहारे यांच्याशी याबाबत विचारणा केली असता सदर नळाच्या टाकीत ब्लिचिंग पावडर टाकण्यात आले होते. मी परत तपासणी करून टंकी सफाई व ब्लीचिंगची व्यवस्था करीत असल्याची माहिती त्यांनी दिली.

Previous articleबोगस बी-बियाणे विकणाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे -हेमंत गडकरी
Next articleसारंग दाभेकर यांना एक दिवसाचा पीसीआर