भाजपा अहेरी मंडल बैठक संपन्न बुथरचना मजबूत करा -विजयजी पुराणिक यांचे आवाहन

80

 

रमेश बामनकर/अहेरी तालुका प्रतिनिधी

अहेरी :-भारतीय जनता पार्टीची अहेरी मंडल बैठक आज स्थानिक विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संपन्न झाली, ह्या बैठकीत भाजपा प्रदेश संघटन महामंत्री मा.विजयजी पुराणिक ह्यांनी संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करून, आगामी नगर पंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका जिंकण्यासाठी अहेरी तालुक्यात बूथ रचना अधिक मजबूत करून,भाजपा कार्यकर्त्यांनी थेट जनतेपर्यंत पोहचण्याच्या रणनीती बद्दल ह्यावेळी पक्षाच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधीनां सविस्तर मार्गदर्शन केले.
ह्यावेळी खासदार अशोकजी नेते, आमदार डॉ.रामदासजी आंबटकर, आमदार डॉ.देवरावजी होळी, जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, जेष्ठ नेते बाबूरावजी कोहळे,जिल्हा महामंत्री रवी ओल्लालवार, गोविंदजी सारडा, भाजपा तालुकाध्यक्ष रवी नेलकुद्री, जिल्हा उपाध्यक्ष विनोद अक्कनपल्लीवार, आदिवासी आघाडी प्रदेश सदस्य तथा जिल्हा सचिव संदीप कोरेत,पंचायत समिती सदस्य प्रशांत ढोंगे, अमोल गुडेल्लीवार, मुकेश नामेवार,पप्पु मद्दीवार, शंकर मगडीवार, श्रीनिवास चटारे,नागेश रेड्डी, नितीन गुंडावार,संजय अलोने, अभिजित शेंडे,नारायण सिडाम, दिलीप पडगेलवार सह अहेरी तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व लोकप्रतिनिधीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.