महागाव येथील महिलेला मिळाला प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना चा लाभ – जीडीसीसी शाखा अहेरी तर्फे मिळाला दोन लाखाचा धनादेश

97

 

रमेश बामनकर/अहेरी तालुका प्रतिनिधी

अहेरी :- अहेरी येथील जिल्हा अंतर्गत असलेला गडचिरोली जिल्हा को-ऑपरेटिव्ह बँक शाखा अहेरी तर्फे महागाव रहिवासी संजय नारायण मडगुलंवार यांनी प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना अंतर्गत स्वतःचा विमा वार्षिक 330 रुपये देऊन केला होता आणि त्यांचं आकस्मिक मृत्यू 5 ऑक्टोंबर 2020 ला झाली त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या विम्याची रक्कम दोन लाख रुपये त्यांची पत्नी प्रीती संजय मडगुलवार यांना यांना शाखेच्या व्यवस्थापक चंद्रशेखर मुक्कावार यांच्या हस्ते देण्यात आली
प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना तसेच प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजना ही कर्ता पुरुष गेल्यानंतर परिवारास एक पाठिंबा निर्माण करणारी आहे म्हणून याचा लाभ बँकेतील सर्वच खातेदारांनी घ्यावा अशी आशा लाभ धनादेश देताना शाखेचे व्यवस्थापक चंद्रशेखर मुक्कावार यांनी त्यावेळी प्रकट केली. धनादेश देताना शाखेचे उपव्यवस्थापक संतोष धात्रक तसेच शाखेचे कर्मचारी कलाम खान, पवन गद्देवार, मोहन प्रधान, विवेक खरकाटे, कैलास हेमने, अनिल नागोसे व राजू पोटवार उपस्थित होते