पादुका संस्थान मध्ये अस्थी रोग निदान शिबीर संपन्न

86

 

अकोट ता.प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

श्री गजानन महाराज पादुका संस्थान मूंडगाव येथे प्रसिद्ध अस्थी रोग तज्ञ डॉ पार्थ गवात्रे दुर्गा चौक, अकोला यांचे तपासणी शिबीर आज दि. २४ जानेवारी रविवार रोजी संपन्न झाले.
यावेळी हाडांच्या विविध रोग व समस्या यावर रुग्णांना उपचार व मार्गदर्शन केले गेले. पंचक्रोशीतील रुग्णांनी या तपासणी शिबीराचा लाभ घेतला.
यावेळी संस्थानचे वतीने डॉ पार्थ गवात्रे व त्यांचे सहकारी डॉ नवथळे यांचा विश्वस्त मंडळाकडून शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.