दहा वर्षाची ज्ञानेश्वरी शेटे बनली शिवचरित्रकार बालकीर्तनकार, सर्वत्र कौतुक कीर्तनाच्या माध्यमातून चालवते माऊली गोरक्षण संस्थान

0
119

 

अकोट ता. प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे

सध्या वारकरी संप्रदाय मध्ये इंदुरीकर महाराज,बाबा महाराज सातारकर, पुरुषोत्तम महाराज पाटील, ज्ञानेश्वर महाराज पठाडे,शिवलीलाताई पाटील, मुक्ताताई चाळक आदींची कीर्तने राज्यभर गाजत आहेत. ही कीर्तनाची संस्कृती अखंडित चालू राहावी म्हणून काही टिव्ही चैनल ने स्वतंत्र कीर्तनाचा कार्यक्रम दाखवणे सुरू केले,आहे त्यामुळे वरुर जऊळका येथील ह. भ. प.गणेश महाराज शेटे यांची 10 वर्षे ची मुलगी ह.भ.प. ज्ञानेश्वरी दीदी शेटे हिने कीर्तनकार बनायची इच्छा तिचे बाबा ह.भ.प. गणेश महाराज शेटे यांच्या जवळ व्यक्त केली. आणि लॉक डाऊन च्या काळात तिला कीर्तनाचे धडे दिले आणि तिने अल्पावधीतच सराव करून ईश्वरीय देणगी प्रमाणे कीर्तन करणे सुरू केले.आणि बघता बघता तिने राज्यभर किर्तन करणे सुरू केले आहे.या कीर्तनाच्या माध्यमातून तिला मिळणारे मानधन हे स्वतः खर्च न करता ते सर्व मानधन तिने गोरक्षण संस्थेला देण्याचा मानस व्यक्त केल्याने तिच्यासाठी गोरक्षण संस्थेची निर्मिती करण्यात आली आहे.
लॉक डाऊन काळामध्ये अवघ्या सहा महिन्यात ऑनलाईन बालसंस्कार शिबिर व काही संत मंडळींच्या मार्गदर्शनातून ज्ञानेश्वरी कीर्तनकार बनली सुध्दा आणि तिचे राज्यभर कीर्तन सुरू झाले तिचे सर्वत्र कौतुक होत.असतांनाच कीर्तनाच्या माध्यमातून मिळणारे मानधन गो रक्षण संस्थेला मिळावे म्हणून गावांमध्येच माऊली गोरक्षण संस्था ची निर्मिती करून तिला या संस्थेचे अध्यक्षपद दिले आहे .
ज्ञानेश्वरी दीदी दररोज हजारो लोकांमध्ये कीर्तन करून शिवचरित्र व संतांच्या विचारांचा वारसा चालवीत किर्तन करायला सुरुवात केली आहे कीर्तनामध्ये त्याची बोलण्याची शैली, गायन, वारकरी पावळ्या, अगदी सहज विनोद ह्या सर्व कला तिला अवगत असल्यामुळे धार्मिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील सर्व मंडळी तिचे कौतुक करत आहेत ज्ञानेश्वरी दिदि किर्तन करून आपलं शालेय शिक्षण सुद्धा अकोटला गुड सेफर स्कूलमध्ये घेत आहे. तिला एकही भाऊ नसून बहिणी आहेत याबाबत तिच्या वडिलांना तीळमात्रही दुःख नाही कारण मुलगी कर्तबगारी मध्ये मुलापेक्षा कोणत्याच क्षेत्रात कमी नाही या मुलीचा आदर्श इतरही मुलींच्या वडीलांनी घ्यावा अशीच ज्ञानेश्वरी शेटे आहे .
एवढया कोवळ्या वयात जेष्ठ कीर्तनकार सारखे कीर्तन करणे आणि वाहवा मिळविणारी बालिका कीर्तनकार ज्ञानेश्वरी भविष्यात खूप मोठी कीर्तनकार बनणार असल्याचे संकेत आताच मिळत आहेत.