शिवसेना प्रमुख स्व:बाळासाहेब ठाकरे व सुभाषचंद्र बोस जयंती साजरी केली:-सिक्की यादव नगर सेवक बल्लारपुर शिवसेना, युवा सेना,महिला आघाडी व आरोग्य लोककल्याण समितीचे कडून नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले

0
135

 

शंकर महाकाली
दख़ल न्यूज़ भारत
बल्लारपुर तालुका प्रतिनिधि
📲 ८८५५०४३४२०

बल्लारपूर :- दिनांक 23 जानेवारी हिंदुह्रदय सम्राट वंदनीय आदरणीय स्व: बाळासाहेब ठाकरे जयंती उत्साहात सर्वव स्वतंत्रता सेनानी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंती च्या औचित्य साधून
बल्लारपुर शिवसेना, महिला आघाडी व युवासेना व आरोग्य लोककल्याण समितीचे संयुक्त विद्यमाने बाबा शाहू शहर प्रमुख,यांच्या नेतृत्वाखाली व प्रकाश पाठक तालुका प्रमुख बल्लारपुर,यांच्या मार्गदर्शनाखाली व सिक्की यादव उपजिल्हा प्रमुख व नगरसेवक बल्लारपुर,यांच्या प्रमुख उपस्थितीत वंदनीय स्व:बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पांजली पुजा अर्चना करुन बल्लारपुर शहरात 23 जानेवारी ते 4 फेब्रुवारी पर्यंत नेत्र तपासणी, चश्मे व औषधी वितरण शिबीराचे शुभारंभ करण्यात आले।

या कार्यक्रमास सिक्की यादव उपजिल्हा प्रमुख व नगरसेवक बल्लारपुर यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनचे कौतुक व सर्व बल्लारपुर नागरिकांना या संधी च्या जास्तीत जास्त संख्येने लाभ घेण्यासाठी आग्रह (आव्हान)करण्यात आले. कार्यक्रमाचे सफलतार्थ प्रामुख्याने सौ. कल्पना ताई गोरघाटे महिला उप जिल्हाप्रमुख,व सौ. ज्योती ताई गेहलोत महिला शहर प्रमुख,रंजीताताई बीरे नगरसेविका बल्लारपुर, शेख युसुफ, फिरोज भाई, रतिन भैय्या,आनंद हनमंत्तु, संदीप बोरकर, बॉबी कादासी, व इतर शिवसैनिकांनी आपली उपस्थिती दर्शवली.