वरोरा शहरातील युवकांचा भाजपा युवा मोर्चात पक्ष प्रवेश कार्यक्रम संपन्न.

देशाला योग्य दिशा देण्याचे कार्य फक्त युवकांच्या हाती आहे म्हणून युवकांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर समाजामध्ये उत्तम स्थान निर्माण करा :- आशिष देवतळे, जिल्हा अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा

77

 

शंकर महाकाली
दख़ल न्यूज़ भारत
बल्लारपुर/चंद्रपूर तालुका प्रतिनिधि
📲 ८८५५०४३४२०

वरोरा :- दिनांक 24 जानेवारी 2021 रोजी भारतीय जनता युवा मोर्चा वरोरा शहराच्या वतीने शहरातील अनेक युवकांनी आ.सुधिर मुनगंटीवार, माजी केन्द्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर व भाजपा जिल्हाध्यक्ष मा.देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व वरोरा शहराचे नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांच्या अध्यक्षतेखाली, भाजपा शहराध्यक्ष सुरेश महाजन, नगरसेवक दिलीपजी घोरपडे ,ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाशजी दुर्गपुरोहित,जिल्हा उपाध्यक्ष इम्रान खान, जिल्हा सचिव महेश श्रीरंग, केतन शिंदे, विद्यार्थी आघाडी जिल्हा सहसंयोजक प्रतिक बारसागडे, माजी जिल्हा उपाध्यक्ष आकाश वानखेडे, सोशल मीडिया जिल्हा संयोजक आदीत्य शिगांडे ,सोशल मीडिया विधसनसभा प्रमुख राहुल बांदुरकर , शहर उपाध्यक्ष संजूजी राम, अभिषेक सातोकर, राहुलजी दागमवार,रोशनजी लखोटे, निषिकांतजी डफ,अभिजितजी गयनेवार,कुणाल नक्षीने, अमोल शेंडे, प्रतीक काळे,यांच्या विशेष उपस्थितीत परी ला‌न वरोरा येथे अमोलजी देऊडकर युवा मोर्चा जिल्हा कार्यकारिणी सदस्य यांचा माध्यमातून कार्यक्रम पार पडला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते युवकांना पक्षाचा दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन युवा मोर्चा मध्ये प्रवेश करण्यात आला. याप्रसंगी युवा मोर्चाचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.