नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंती दिना निमात्य वणीत विविध कार्यक्रम

72

 

वणी : परशुराम पोटे

त्रिमूर्ती गणेश मंडळ व स्पोर्टींग क्लब यांच्या विद्यमाने दि.२३ जानेवारी ला आजाद हिंद सेनेचे संस्थापक आणि ” तूम मुझे खून दो मै तूम्हे आजादी दुंगा “या ब्रिद्र वाक्यांने मन-मनात ओळखल्या जाणार्‍या नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंती दिनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांची १२५ व्या जयंती निमित्य येथिल सुभाषचंद्र बोस चौकात सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजे दरम्यान रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ८८ रंक्तदात्यांनी रंक्तदान केले. यावेळी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र व विधवा महिलांना साडीचे वाटप करण्यात आले. रंक्तदात्यांनी दान केलेले रक्त शासकीय ग्रामीण रूग्णालय चंद्रपूर येथील रक्तपेढीत संकलन करण्यात आले. रक्तदान हे सर्वक्षेष्ठ दान असून आपल्या दान केलेल्या रंक्तामूळे कूणाची रंक्ताची गरज भागू शकते, व त्याला जिवनदान मिळू शकते,या रक्तदान शिबीरात नागरीकांनी उस्फूर्तपणे सहभाग दर्शवून रंक्तदान शिबीर पार पडले.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून स्थानिक आमदार संजिवरेड्डी बोदकूलवार होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी यवतमाळ मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संजय देरकर होते. तसेच कार्यक्रमाचे प्रमूख पाहूणे दिनकरराव पावडे,भाजपा जिल्हा सरचिटणीस रवी बेलूरकर, श्रिकांत पोटदूखे उपाध्यक्ष न.प.वणी, सौ.सिमा राजू डवरे, राकेश बूग्गेवार नगर सेवक उपस्थित होते. ह्या प्रसंगी सिमा डवरे यांनी आपल्या भाषणाद्रारे सूभाषचंद्र बोस यांची शिस्त,शौय,धैर्य व तसेच भारतीय स्वांतत्र्य संग्रामात ज्या थोर विरांनी कशाचीही पर्वा न करता उडी घेतली आणि अगदी निकराने लढा देत भारताला स्वतंत्र करण्यात मोलाची भूमीका बजावली, त्या थोर विरांमध्ये नेताजी सूभाषचंद्र बोस यांचे नाव आघाडीने घेतले जाते असे त्या म्हणाल्या, वाहतूक शाखेचे प्रमूख नंदकिशोर आयरे यांच्या उपस्थित समारोप कार्यक्रम पार पडला. यावेळी त्रिमृर्ती गणेश मंडळाचे अध्यक्ष दिगांबर(ऊर्फ)डि.के.चांदेकर, अजय भटघरे त्रिमृर्ती स्पोर्टींग क्लब अध्यक्ष, सूनिल कि.भटगरे महादान रंक्तदान शिबीराचे सयोजक, श्रीकांत पोटदूखे उपाध्यक्ष नगर परिषद तथा भाजपा शहर अध्यक्ष, श्रीकांत गंगसेट्टीवार, नरेश रामगीरवार, विलास गाणफाडे,जिवन काळे, शरद मंथनवार, अशोक पोटदूखे,संदिप नागपूरे, सागर खडसे,सचिन उरकूडे, पवन बोबडे, नाना फटाले,अनंत येसेकर,पंकज भटगरे, पंप्पू भटगरे, विनोद बी, सिडाम सहअसंख्य नागरीक उपस्थित होते.