बोगस बी-बियाणे विकणाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे -हेमंत गडकरी

198

 

( गजानन ढाकुलकर नागपूर)

नागपूर :- दरवर्षी बोगस बियाणे विकले जाते, अगोदरच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते , गेले काही वर्षांपासून दर कृषी हंगामात घडणारी ही नित्यनियमित बाब असतांनाही या बी बियाणे उत्पादकवर फौजदारी गुन्हे लावून कडक कारवाई करून त्याचा परवाना का रद्द करीत नाही ? हे करणे तर सरकारच्या हातात आहे ना ? मग सरकार का पाऊले टाकीत नाही ? सरकारने जर कडक कारवाई केली परवाना रद्द केला तर पुढील वर्षी कुठल्याही बी बियाणे उत्पादकांची असे पापिकृत्य करण्याची हिम्मत होणार नाही असे मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी नागपूर महसूल विभागाचे विभागीय आयुक्त डॉ संजीवकुमार यांना सवाल केला , मनसेच्या वतीने बोगस बी बियाणे तसेच पीक विम्याच्या महत्वपुर्ण प्रश्नावर निवेदन सादर करून चर्चा करण्यात आली,खत व युरिया मुद्दाम उपलब्ध न करून टंचाई दाखविणे व नंतर चढ्या किमतीत विकणे असा सर्रास प्रकार अनेक कृषी केंद्राकडून पूर्व विदर्भात सुरू असल्याचे त्याच प्रमाणे पीक विमा योजने अंतर्गत मिळणारा मोबदला यासाठी होणारा प्रचंड त्रास काही अर्थ सहाय्य करणाऱ्या खाजगी कंपन्याकडून होणारा त्रास या व अश्या अनेक विषयांवर विभागीय आयुक्त डॉ संजीवकुमार यांचेशी मनसेच्या शिष्टमंडळाने चर्चा केली व दरवर्षी निर्माण होणाऱ्या या समस्येवर सरकारची नियत साफ असेल तर नक्कीच तोडगा निघू शकतो असेही हेमंत गडकरी यांनी डॉ संजीवकुमार यांना सांगितले .मनसेच्या शेतकरी सेनेचे उपाध्यक्ष अतुल वांदिले यांनी ज्यामुळे शेतकरी बेजार होतो अशी कुठलीही कृती होणार नाही याकरिता पूर्व विदर्भातील अधिकारी म्हणून आपण दक्षता घ्यावी असे सुचविले, शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या या समस्येवर कायमस्वरूपी उपाय काढण्यासाठी नक्कीच संबंधित अधिकारी वर्गाशी चर्चा व कृती करू असे आश्वासन डॉ संजीवकुमार यांनी मनसेच्या शिष्टमंडळास दिले यावेळी मनसेच्या शिष्टमंडळात हेमंत गडकरी, अतुल वांदिले यांचे सोबत ग्रामीण भागातील पदाधिकारी विशेषतः शेतकरी कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.