नेहरू युवा केंद्र व जिवीका फाऊंडेशन,धुळे यांच्या मार्फत वार कुंडाणे येथे चित्रकला स्पर्धा घेण्यात आली

83

 

राजू हालोर उडाणे धुळे( प्रतिनिधी)

धुळे ता, येतथिल नेहरू युवा केंद्र, व जिवीका फाऊंडेशन ,धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती निमित्त कुंडाणे वार येथे चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली यावेळी.
जिजाऊ मंडळ अध्यक्ष (कुंडाणे) वार निलम पाटील व सामाजिक कार्यकर्ते किशोर वाघ यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करून चित्रकला स्पर्धा घेण्यात आले त्यात ओम पाटील यांनी प्रथम क्रमांक मिळवला तर श्याम वाघ यांना द्वितीय क्रमांक व प्रांजल जाधव यांना तृतिय क्रमांक देण्यात आला. व स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना नेहरू युवा केंद्राचे स्वयंम सेवक उमा बागुल व जिवीका फाउंडेशन चे किरण कुवर व गणेश पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी कार्यक्रमासाठी जिजाऊ मंडळ सदस्य विशाल वाघ आकाश सुखदेव वाघ पुजा वाघ,वंदना शेलार व अंगणवाडी कर्मचारी रंजना पाटील, भारती सोनवणे कल्पना गिरासे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.