अबब!..गोंदिया रामनगर पोलिस स्टेशनच्या ठाणेदारांनी,सामुहिक लैंगिक अत्याचार व अपघात प्रकरणाचा,गुन्हा चार दिवसपर्यंत नोंदवीला नाही..? — तक्रार तर घेतलीच नाही? — ठाणेदाराच्या जातीवादी कारभाराची अजबगजब कमालच! — प्रमोद घोंघे ठाणेदार आहेत की हुकुमशहा? — कुणाच्या दबावाखाली काम करतात ठाणेदार प्रमोद घोंघे..? — उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणाची पुनरावृत्ती गोंदीयात..

1791

 

प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
अनील मेश्राम
उपसंपादक

अल्पवयीन विद्यार्थिनीचे,गुप्ता यांच्या वर्ग शिकवनी परिसरातून अपहरण करणे,अपहरण केल्यानंतर अल्पवयीन मुलीवर सामुहिक लैंगिक अत्याचार करणे व जिवंतपणे मारणे आणि अपघात झाल्याचे दाखवने,”अशा प्रकारच्या गंभीर घटनाक्रमाचा गुन्हा,”चार, दिवसांपर्यंत न नोंदवीणारे गोंदिया रामनगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रमोद घोंघे,हे ठाणेदार आहे की हुकुमशहा?या गंभीर प्रश्र्नाने मन शुन्य होते,मन अक्षरशः हेलावते!.

ठाणेदार प्रमोद घोंघे हे एवढ्या मोठ्या गंभीर प्रकरणाची तक्रार न घेण्याचे धाडस का म्हणून करतात? व घटनाक्रमाच्या चार दिवसांनंतर स्वत:च्या मनमर्जी नुसार,”…४ आरोपींना अभय देत, “केवळ एका आरोपीवर, का म्हणून गुन्हा नोंद करतात? हा मुद्दा अतिशय बिकट स्थिती निर्माण करणारा ठरतो आहे.. आणि तेवढाच जाटील बनतो आहे.

ठाणेदार प्रमोद घोंघे यांनी अपहरण करुन लैंगिक अत्याचार करणाऱ्या घटनेकडे व घातपात मृत्यू प्रकरणाकडे,गंभीरतापुर्वक अजिबात लक्ष दिले नसल्याचे त्यांच्या भुमिका वरुन स्पष्ट होते आहे.याचबरोबर आरोपींना वाचविण्यासाठी त्यांनी पिडित परिवाराला पोलिस स्टेशनच्या हेलपाट्या सतत ४ दिवस करायला लावून जाणिवपूर्वक अपमानास्पद वागणूक दिल्याचे त्यांच्या हेकड व उध्दट वर्तनुकीवरुन दिसते आहे.

१) कु. यश रामचंद्र गुप्ता,२) कु.प्रथम जयेश चावडा,३) कु.निखील चंद्रकांत पिपरहेटे,४) कु.कार्तीक दिगंबर टेंभरे,हे चार आरोपी गर्भ श्रिमंताची व राजकीय हस्तींची मुले असल्यामुळे,त्यांना ठाणेदार प्रमोद घोंघे यांनी जाणूनबूजून जातीवादी मानसिकता अंतर्गत आरोपी बनवीले नसल्याचा आरोप,”पिडित धूरवस भैय्यालाल भोयर यांनी आज पत्रकार परिषदेत केला,तद्वतच पिडित पालकांनी अनेक गंभीर घटनाक्रमाचा उलगडा आजच्या पत्रकार परिषदेत केला.यामुळे ठाणेदार प्रमोद घोंघे यांच्या संवेदनहिन कर्तव्याचे डोंगरच पुढे आले.

५ आरोपी पैकी केवळ कुमार रोहीत मनोहर डोंगरेला आरोपी करुन,ठाणेदार प्रमोद घोंघे यांचा,आपन कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याचे दाखवन्याचा खटाटोप हा भयानक छडयंत्राचा व धोकादायक कर्तव्याचा भाग असल्याची शंका येते आहे.परत ठाणेदार प्रमोद घोंगे हे,दबाखाली काम करीत असल्याचा प्रकार नाकारता येत नाही.

मात्र,महाराष्ट्र राज्यातंर्गत जिल्ह्याचे स्थळ असलेल्या गोंदिया-मरारटोली येथील अल्पवयीन मुलीवर अपहरण करून करण्यात आलेल्या सामूहिक लैंगिक अत्याचाराची घटना म्हणजे उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणाची पुनरावृत्तीच होय!